Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्थळ चित्रपटातील भूमिकेसाठी ओमप्रकाश गुंडावार यांचा सन्मान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्थळ चित्रपटातील भूमिकेसाठी ओमप्रकाश गुंडावार यांचा सन्मान आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. २० मार्च २०२५) -         राजुरा येथील सुप्र...
स्थळ चित्रपटातील भूमिकेसाठी ओमप्रकाश गुंडावार यांचा सन्मान
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. २० मार्च २०२५) -
        राजुरा येथील सुप्रसिद्ध नाट्यकलाकार ओमप्रकाश गुंडावार यांनी स्थळ या महिला सक्षमीकरणावर आधारित चित्रपटात रंजूचे वडील, बंडोपंतांची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाची दखल घेत, रामनगर कॉलनीतील नागरिकांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

        ७ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक जयंत सोमलकर असून, ग्रामीण भागातील महिलांच्या शिक्षण आणि स्वातंत्र्याच्या संघर्षावर हा चित्रपट प्रकाश टाकतो. चित्रपटाला टोरॅन्टो फिल्म फेयर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह १५ भारतीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

        या चित्रपटात राजुरा तालुक्यातील संगीता बावणे यांनी गणेशच्या आईची भूमिका साकारली आहे. ओमप्रकाश गुंडावार यांच्या सन्मान सोहळ्याला माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, रामबाग समितीचे अध्यक्ष किरण ढुमणे, प्रा. डॉ. संजय गोरे, एड. प्रशांत अटाळकर, किरण बरडे, शशिकांत धनवलकर, श्रीकांत भोयर, सौरभ चौधरी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी ओमप्रकाश गुंडावार यांच्या अभिनयाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top