"संवाद महिलांचा" कार्यक्रमाने जागतिक महिला दिन साजरा!
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०९ मार्च २०२५) -
मौजा पाचगाव येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बचत गट, ग्रामसंघ पाचगाव आणि अंबुजा फाउंडेशन, उत्तम कापूस यांच्या वतीने "संवाद महिलांचा" हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुषमा शुक्ला (JCI राजुरा रॉयल) होत्या, तर उद्घाटन सौ. धुस्मिता पाडी (अध्यक्ष, JCI राजुरा रॉयल) यांनी केले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सौ. उज्वलाताई अकबरशाह आत्राम (उपसरपंच, ग्रामपंचायत पाचगाव), सौ. अनिता गोपाल जंबुलवार (अध्यक्ष, ग्रामसंघ पाचगाव), सौ. कल्पना संजय सोनुर्ले (सचिव, ग्रामसंघ पाचगाव), सौ. सुनंदा देवराव डोंगे (कोषाध्यक्ष, ग्रामसंघ पाचगाव), सौ. वर्षा चौधरी (शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाचगाव) व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागात प्रथमच अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संपूर्ण नियोजन महिलांच्याच हातून करण्यात आले. कार्यक्रमात महिलांनी आपले नृत्य, गायन व अनुभव कथन करून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. स्पर्धकांना पारितोषिके सौ. सुनंदा डोंगे व अंबुजा फाउंडेशन यांच्या वतीने प्रदान करण्यात आली. तसेच JCI राजुरा रॉयलच्या अध्यक्ष सौ. मधुस्मिता पाडी यांनी ग्रामसंघाला हॅलोजन भेट दिली, ज्याबद्दल ग्रामसंघाकडून त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
संचालन सौ. माधुरीताई पिंपळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. मनीषाताई खाडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील सर्व महिला बचत गटाच्या सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.