Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रेमांजली महिला संस्थेचा महिला दिनी कार्यक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रेमांजली महिला संस्थेचा महिला दिनी कार्यक्रम  टाकाऊ पासून टिकाऊ तयार करण्याचे दिले प्रशिक्षण आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले राजुरा (दि. ०९ मा...
प्रेमांजली महिला संस्थेचा महिला दिनी कार्यक्रम 
टाकाऊ पासून टिकाऊ तयार करण्याचे दिले प्रशिक्षण
आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले
राजुरा (दि. ०९ मार्च २०२५) -
        जागतिक महिला दिनानिमित्त प्रेमांजली महिला बहुउद्देशीय संस्थेने महिलांना टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ पदार्थ व कुंड्या तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.सुनिता जमदाडे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिता कर (एलआयसी) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल प्रा.सुनिता जमदाडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच प्रेमांजली च्या हुंडामुक्त अभियानाअंतर्गत ज्ञानेश्वर आदे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमात स्व. आशाताई रागीट स्मृतीप्रित्यर्थ प्रा.भावना रागीट यांच्या तर्फे पर्यावरण रक्षण पुरस्कार कु.सुनेशी विनोद भोंगळे हिच्या पर्यावरण पुरक कुंड्या निर्मीतीच्या कार्यकर्तृत्वाला देण्यात आला. तसेच प्रेमांजली च्या टाकाऊपासुन टिकाऊ निसर्गपुरक कुंड्या निर्माण करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा धंदरे यांनी केले. प्रेमांजली संस्थेने वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगीतले. संचालन प्रा.भावना रागीट आणि आभार निशा मोहुर्ले यांनी मानले. यावेळी संस्थेच्या सचिव साधना येरमे, सदस्या वत्सला चौधरी, गीता घरत, कल्पना जामुनकर, रेखा वासाडे, शुभांगी वाटेकर, वासंती आकरे, सुचिता पिंगे, गीता काळे, मयुरी चौधरी यांचेसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top