Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: समृध्द व यशस्वी जीवनासाठी मुलींनी व्यक्त व्हावे – ॲड. कुंदाताई जेनेकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
समृध्द व यशस्वी जीवनासाठी मुलींनी व्यक्त व्हावे – ॲड. कुंदाताई जेनेकर प्रा. मंगला माकोडे यांचा विशेष सत्कार आदर्श शाळेत जागतिक महिला दिन उत्...
समृध्द व यशस्वी जीवनासाठी मुलींनी व्यक्त व्हावे – ॲड. कुंदाताई जेनेकर
प्रा. मंगला माकोडे यांचा विशेष सत्कार
आदर्श शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०९ मार्च २०२५) -
        मुलींनी समृद्ध व यशस्वी जीवनासाठी कोणते पाऊले उचलावीत याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच मुलींनी स्वतःला कमी लेखू नये, स्वप्न पाहावी आणि ती पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्यावे असा प्रेरणादायी संदेश ॲड. कुंदा जेनेकर यांनी दिला. त्या बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर व आदर्श हायस्कूल, राजुरा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दरम्यान बोलत होत्या. 

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे, प्रमुख अतिथी म्हणून सचिव भास्करराव येसेकर, संचालक मधुकरराव जानवे, अविनाश निवलकर, अल्का सदावर्ते तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती ॲड. कुंदाताई जेनेकर, सत्कारमूर्ती म्हणून प्रा. मंगला माकोडे, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, राष्ट्रीय हरित सेनेचे बादल बेले उपस्थित होते. महिला दिनाचे औचित्य साधून या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका प्रा. मंगला माकोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

रंगतदार स्पर्धा आणि विद्यार्थी-पालकांचा सहभाग
        महिला दिनानिमित्त माता-पालक व विद्यार्थ्यांची युगल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक परी वाघे, द्वितीय प्रियांशू वानखेडे, तृतीय स्वरा अगडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शालेय स्तरावरील पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक ममता बाकेवार, द्वितीय सुरक्षा गुरनुले व सुवर्णा गिरसावळे तर तृतीय रुपाली निमकर व उमा जेनेकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तांदूळ, नाचणी, बाजरी, ज्वारी , मका, मोट, चना, यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात आले होते. संचालन शिक्षिका सुनिता कोरडे व चैतण्या कवलकर, सानिका येरणे यांनी केले. प्रास्तावीक मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी तर आभार विद्यार्थीनी खुशी आदे यांनी मानले. स्काउट्स गाईड्स युनिट, राष्ट्रीय हरित सेना विध्यार्थी व शालेय विद्यार्थी करीता कायदेविषयक मार्गदर्शन घेण्यांत आले. यावेळी ॲड. कुंदा जेनेकर यांनी महिला - मुलींच्या बाबतीत असलेले कायदे, कलम याविषयी सविस्तरपणे माहिती दिली. मंगला माकोडे यांनी मुलगा मुलगी एकसमान असून यात अजिबात भेदभाव करू नये असे प्रतिपादन केले. अल्का सदावर्ते यांनी महिलांचा सन्मान करा. स्त्री पुरुष हे दोन्ही घटक समाजात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात असे प्रतिपादन केले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढवणे, महिलांचे हक्क व अधिकार याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश साध्य झाला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top