Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पत्नीला आधी दिला करंट ; मृत्यू झाला नाही लक्षात येताच पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून केले पत्नीला ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पत्नीला आधी दिला करंट मृत्यू झाला नाही लक्षात येताच पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून केले पत्नीला ठार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर...


  • पत्नीला आधी दिला करंट
  • मृत्यू झाला नाही लक्षात येताच पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून केले पत्नीला ठार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती, पत्नीत झालेल्या वादाचे रूपांतर क्रूर घटनेत झाले. रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला विद्युत करंट देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्युत करंटने पत्नीचा मृत्यू झाला नाही हे लक्षात येताच पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नीला ठार केले. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यात आज उघळकीस आली.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना जिल्ह्यातील भंगाराम तळोधी येथे घडली. योगीता राजू बावणे असे मृत महीलेचे नाव आहे. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचावर गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सूरू आहेत. तर हत्येचं नेमकं कारण काय ? याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलीस संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, पुढील तपास ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गर्शनात सुरू आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top