Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धोपटाळा WCL कॉलनीत महिलेची निर्घृण हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल राजुरा पोलिसांसमोर खुनाचे आवाहन; अज्ञात आरोपीचा शोध सुरू आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. 29 मे 2026) -...
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
राजुरा पोलिसांसमोर खुनाचे आवाहन; अज्ञात आरोपीचा शोध सुरू
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. 29 मे 2026) -
        पोलीस स्टेशन राजुरा अंतर्गत येणाऱ्या WCL कॉलनी धोपटाळा टाऊनशिप परिसरात एका महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

        मृत महिला शितल रणधीर कुंभारे वय 36 वर्षे, रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या मुलीसह माहेरी धोपटाळा येथील क्वॉर्टर क्रमांक 52/2 मध्ये राहण्यासाठी आल्या होत्या. दिनांक 29 मे 2026 रोजी रात्री शितल कुंभारे व त्यांची मुलगी घरात झोपलेली असताना रात्री 12.30 वाजेपासून ते सकाळी 10.00 वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने घरात अनधिकृत प्रवेश करून कोणत्यातरी धारदार शस्त्राने शितल कुंभारे यांचा गळा चिरून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मृत महिलेचे पती रणधिर राजू कुंभारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन राजुरा येथे भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) व 332 (अ) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

       घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशन राजुरा येथील पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून परिसरातील संशयित हालचाली व अन्य तांत्रिक बाबींची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक आसीफराजा शेख यांच्या नेतृत्वात या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

#RajuraNews #ChandrapurNews #Dhopatala #WCLColony #CrimeNews #MurderCase #RajuraPolice #ChandrapurCrime #BreakingNews #MaharashtraNews #VidarbhaNews #PoliceInvestigation #CrimeInMaharashtra #AamchaVidarbha #LatestMarathiNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top