Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धार्मिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गाचे काँक्रीटीकरण पूर्ण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हनुमान गुढा परिसरातील रस्ता अखेर पूर्ण; नगराध्यक्ष निलेश ताजने यांच्या पाठपुराव्याला यश आमचा विदर्भ - दीपक शर्मा  गडचांदूर (दि. १८ मे २०२६) ...
हनुमान गुढा परिसरातील रस्ता अखेर पूर्ण; नगराध्यक्ष निलेश ताजने यांच्या पाठपुराव्याला यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
गडचांदूर (दि. १८ मे २०२६) -
        CSR च्या माध्यमातून गडचांदूर शहराच्या विकासाला नवी गती मिळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नगराध्यक्ष निलेश ताजने यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रभाग क्र. ९ अंतर्गत मुक्तीधाम ते पुरातन हनुमान मंदिर, हनुमान गुढा परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्याचे काम अखेर पूर्णत्वास आले असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर मार्ग हा परिसरातील नागरिकांसाठी तसेच विविध धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुरातन बुद्धभूमी, लंगडा मारुती मंदिर, हनुमान गुढा तसेच शनिमंदिर येथे जाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. विशेषतः शनिवारी तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी या परिसरात मोठी वर्दळ असते. विद्यार्थ्यांच्या शाळेत ये-जा करण्यासाठी देखील हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र खराब रस्त्यामुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्याच्या काळात मुक्तीधाम परिसरात जाणेही कठीण होत होते.

        परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी हा विषय गांभीर्याने घेत प्रशासन तसेच माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडत त्यांनी या विकासकामासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांतून कंपनीच्या CSR निधीतून सुमारे ३५० मीटर काँक्रीट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची समस्या दूर झाली असून शहराच्या विकासाला नवी गती मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनासोबतच धार्मिक व सामाजिकदृष्ट्याही या रस्त्याचे मोठे महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
        रस्त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष निलेश ताजने उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी नगर परिषद गडचांदूरचे उपनगराध्यक्ष संजय मेंढी होते. प्रमुख उपस्थितीत बांधकाम सभापती रामसेवक मोरे, पाणीपुरवठा सभापती शेख सरवर, ईआर हेड नवीन कौशिक, नगरसेवक महेश आवारी, सतीश बेतावार, चेतन शेंडे, नगरसेविका सारिका डोर्लीकर, अश्विनी कांबळे, मनिषा परचाके, संगीता गाऊत्रे आदी उपस्थित होते. तसेच महादेव एकरे, महादेव जैस्वाल, संदीप शेरकी, कुणाल पारखी, सुयोग कोंगरे, मयूर पोटदुखे, इम्रान शेख, राधेश्याम चुट्टे, पराग पोटदुखे, योगेंद्र केवट, श्रीकांत घोरफडे, विक्की मेळावार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        यावेळी नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने CSR च्या माध्यमातून परिसराच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत कंपनीने राबविलेल्या विकासकामांमुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

#Gadchandur #GadchandurNews #CSR #UltratechCement #ManikgarhCement #NileshTajne #RoadDevelopment #ChandrapurNews #VidarbhaNews #MaharashtraNews #HanumanGuda #SmartCityDevelopment #LocalNews #Mayor #Nilesh Tajne #Nagaradhyaksha #InfrastructureDevelopment #CSRDevelopment #Nagarpalika #GadchandurCity #AamchaVidarbha #SocialDevelopment #ConcreteRoad #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top