Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपूर क्षेत्रीय रुग्णालयात आंतरराष्ट्रीय नर्स दिवस उत्साहात साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या पुढाकार राजुरा (दि. १६ मे २०२६) -         भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली चंद्रपूर / बल्लारपूर क्ष...
भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या पुढाकार
राजुरा (दि. १६ मे २०२६) -
        भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली चंद्रपूर / बल्लारपूर क्षेत्राच्या वतीने क्षेत्रीय रुग्णालय बल्लारपूर येथे “आंतरराष्ट्रीय नर्स दिवस” कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नर्सेस, आया आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रदेश मंत्री सुवर्णलता बोंडे उपस्थित होत्या. तसेच एएमओ डॉ. कैलाश उंबरकर, डेप्युटी एएमओ डॉ. अमरनाथ रेड्डी, डेप्युटी एएमओ डॉ. वानिता लाल, एरिया जेसीसी समय्या येल्कापल्ली, वर्धा व्हॅली अध्यक्ष प्रवीण मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन महामंत्री श्रीनिवास कोपुला यांनी केले. यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, कर्मचारी व रुग्णालयातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        कार्यक्रमादरम्यान सर्व नर्स बंधू-भगिनींना गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शासकीय रुग्णालयातून आलेल्या नर्सेस व आयांना देखील भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. आरोग्य सेवेत त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सर्व डॉक्टर, नर्सेस, एरिया हॉस्पिटल कर्मचारी तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, पुरुष व महिला कार्यकर्ते, क्षेत्रीय रुग्णालय कर्मचारी आणि संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले. अध्यक्षांच्या अनुमतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

#InternationalNursesDay #NursesDay2026 #Ballarpur #ChandrapurNews #WardhaValley #CoalMineWorkersUnion #IndianCoalMineWorkersUnion #HealthcareHeroes #NursesRespect #HospitalStaff #VidarbhaNews #BallarpurHospital #Chandrapur #MaharashtraNews #आंतरराष्ट्रीयनर्सदिवस #नर्सदिवस #बल्लारपूर #चंद्रपूर #वर्धाव्हॅली #आरोग्यसेवा #नर्सेस #भारतीयकोयलाखदानमजदूरसंघ #विदर्भन्यूज #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top