Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई : डॉ. रमेशकुमार बोरकुटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अफवांना बळी पडू नका, “यहोवा यिरे” संस्था सक्षम व सुरक्षित सभासदांनी दिला संस्थेला पाठिंबा चंद्रपूर (दि. १६ मे २०२६) -         “यहोवा यिरे बच...
अफवांना बळी पडू नका, “यहोवा यिरे” संस्था सक्षम व सुरक्षित
सभासदांनी दिला संस्थेला पाठिंबा
चंद्रपूर (दि. १६ मे २०२६) -
        “यहोवा यिरे बचत निधी लिमिटेड” व “यहोवा यिरे अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी लिमिटेड” या संस्थांबाबत काही दिवसांपासून पसरवल्या जात असलेल्या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी संस्थेचे सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी संस्थेच्या सभासदांची आमसभा घेत स्पष्ट व ठाम भूमिका मांडली. या सभेमुळे सभासदांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात दूर झाले. गेल्या काही महिन्यांपासून काही असामाजिक प्रवृत्तीच्या व्यक्तींनी तसेच काही माजी कर्मचाऱ्यांनी संस्थेबाबत चुकीची माहिती पसरवत “संस्था बुडाली”, “सीईओ पळून गेले”, “सभासदांचे पैसे सुरक्षित नाहीत” अशा खोट्या अफवा पसरवल्या. या अफवांमुळे सभासद आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी संस्थेच्या नियमित व्यवहारांवर देखील त्याचा परिणाम झाल्याचे समोर आले.

        सभेत बोलताना सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी स्पष्ट केले की, संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असून सभासदांची गुंतवणूक सुरक्षित आहे. संस्था कुठेही बुडालेली नाही किंवा बंद पडलेली नाही. काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार व विश्वासघात केल्याचे निदर्शनास आले असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर तसेच फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

        संस्थेची बदनामी करून व्यवहारांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे कलेक्शन प्रक्रियेवर परिणाम झाला. त्यामुळे काही काळ विड्रॉल प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या असल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र संस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून पुढील 6 ते 7 महिन्यांत परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईल, असा विश्वास डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी व्यक्त केला. या आमसभेत उपस्थित सभासदांनी देखील संस्थेवर विश्वास व्यक्त करत संस्थेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मोठ्या संख्येने उपस्थित सभासदांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

        शेवटी सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी सभासद, ग्राहक आणि कर्मचारी वर्गाला कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. अधिकृत माहितीसाठी थेट संस्थेशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. “यहोवा यिरे” संस्था ही सभासदांच्या विश्वासावर उभी असून प्रत्येक सभासदाचा पैसा सुरक्षित ठेवणे हीच संस्थेची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

#ChandrapurNews #YehovaYire #DrRameshkumarBorkute #Chandrapur #MaharashtraNews #BreakingNews #FinanceNews #CreditSociety #UrbanCreditSociety #SavingsFund #LocalNews #VidarbhaNews #CooperativeSociety #BankingNews #EconomicNews #सभासद #चंद्रपूर #महाराष्ट्र #यहोवायिरे #डॉरमेशकुमारबोरकुटे #बचतनिधी #अर्बनक्रेडीटसोसायटी #विदर्भन्यूज #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top