Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते ‘सूर्य सेतू एनर्जी’ प्रतिष्ठानचे उद्घाटन उत्साहात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सोलर कृषी पंप ते स्ट्रीट लाईटपर्यंत; ‘सूर्य सेतू एनर्जी’कडून आधुनिक ऊर्जा उपाय आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १६ मे २०२६) -         ग्...
सोलर कृषी पंप ते स्ट्रीट लाईटपर्यंत; ‘सूर्य सेतू एनर्जी’कडून आधुनिक ऊर्जा उपाय
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १६ मे २०२६) -
        ग्रामीण भागात विजेची उपलब्धता वाढवणे आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने मौजा रामपूर येथे दि. १५ मे रोजी युवा व्यावसायिक ओम रमेश बोंडे यांच्या ‘सूर्य सेतू एनर्जी’ या नवीन प्रतिष्ठानचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

         कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये ‘सूर्य सेतू एनर्जी’चे युवा संचालक ओम रमेश बोंडे यांनी बदलत्या काळात सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वस्त व अखंडित वीज कशी उपलब्ध करून घेता येईल याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी शासनाच्या सोलर सबसिडी योजनांविषयी मार्गदर्शन करत नागरिकांनी घरगुती सोलर प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच सौर ऊर्जा ही केवळ घरापुरती मर्यादित न राहता शहर व गावांमधील स्ट्रीट लाईट, शेतांमधील सोलर लाईट, सोलर कृषी पंप, व्यावसायिक सोलर प्रकल्प तसेच EPC सेवांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे वीज खर्चात बचत होण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
         यावेळी बोलताना आमदार देवराव भोंगळे यांनी भविष्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेता सौर ऊर्जा हाच सर्वोत्तम व पर्यावरणपूरक पर्याय असल्याचे सांगितले. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना अखंडित व स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या ऊर्जा प्रतिष्ठानांची मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘सूर्य सेतू एनर्जी’ने ग्रामीण भागात घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असून यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रतिष्ठानच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

        कार्यक्रमादरम्यान बोंडे कुटुंबीयांनी राजूराची आराध्य दैवत असलेल्या माता भवानी मंदिर रामपूर येथे सोलर प्रणाली बसवून देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. या उपक्रमामुळे मंदिर परिसरात अखंडित वीज उपलब्ध होण्यास मदत होणार असून वीज खर्चात मोठी बचत होणार आहे. पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढवून धार्मिक स्थळांमध्येही सौर ऊर्जेचा प्रसार करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. बोंडे कुटुंबीयांच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिक व भाविकांकडून स्वागत करण्यात आले.

        उद्घाटन कार्यक्रमाला माजी जि.प. सभापती सुनील उरकुडे, सुरेश रागीट, सचिन भोयर, नगरसेवक प्रफुल कावळे, माता भवानी मंदिराचे सदस्य अरुण भोयर, जेष्ठ शेतकरी कार्यकर्ते शेषराव बोंडे, रमेश बोंडे, कोल इंडिया सहप्रभारी सुधीर घुरुडे, भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली चंद्रपूर / बल्लारपूरचे महामंत्री श्रीनिवास कोपुला, साईबाबा मंदिर रामपूरचे अध्यक्ष रामाजी फुटाणे, प्रतिष्ठित व्यावसायिक राजेंद्र चांडक, गोपाल मालपाणी, आनंद मस्की, अरुण जमदाडे, राजेश बजाज, चन्ने, नंदुरकर, जेष्ठ पत्रकार मुकरू शेलोटे, दीपक शर्मा, पत्रकार श्रीकृष्ण गोरे, सागर भटपल्लीवार यांच्यासह बोंडे परिवारातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#SuryaSetuEnergy #SolarEnergy #SolarPower #RenewableEnergy #GreenEnergy #Rajura #Rampur #ChandrapurNews #RajuraNews #SolarPump #SolarStreetLight #SolarEPC #SolarSubsidy #Farmers #RuralDevelopment #Employment #MataBhavaniTemple #SustainableDevelopment #सौरऊर्जा #राजुरा #चंद्रपूर #महाराष्ट्रन्यूज #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top