Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मानिकगड रेल्वे स्टेशनवर विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतला कार्यक्रमाचा लाभ आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा : (दि. १५ मे २०२६) -         मानिकगड रेल्वे स्टेशन येथे...
विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतला कार्यक्रमाचा लाभ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा : (दि. १५ मे २०२६) -
        मानिकगड रेल्वे स्टेशन येथे विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंडल सहाय्यक मंडल विद्युत अभियंता बेलगवली यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मानिकगड रेल्वे स्टेशनवर कार्यरत विविध विभागातील कर्मचाऱ्यांना रेल्वे विद्युत विभागाच्या कार्यपद्धती, विद्युत उपकरणांचा सुरक्षित वापर तसेच विद्युत सुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमात मंडल सहाय्यक अभियंता बेलगवली तसेच वरिष्ठ अनुभाग अभियंता (विद्युत) मानिकगड यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. रेल्वे परिसरात काम करताना विद्युत सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

        विद्युत अपघात टाळण्यासाठी सतर्कता, सुरक्षित अंतर राखणे, विद्युत उपकरणांची योग्य हाताळणी आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

#मानिकगड #Manikgarh #RailwayNews #RailwaySafety #ElectricalSafety #विद्युत_सुरक्षा_सप्ताह #RailwayEmployees #IndianRailways #RajuraNews #ChandrapurNews #SafetyAwareness #RailwayDepartment #ElectricalAwareness #MaharashtraNews #RailwayStation #ElectricalEngineering #PublicSafety #RailwayUpdate #SafetyFirst #ManikgarhRailwayStation #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top