आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा : (दि. १५ मे २०२६) -
दि. ७ मे ते १० मे दरम्यान द आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशनच्या वतीने इन्फंट जिझस इंग्लिश स्कूल, राजुरा येथे “युवा सशक्तिकरण सेमिनार”चे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता, सकारात्मक विचारसरणी आणि नैतिक मूल्यांची जडणघडण व्हावी या उद्देशाने हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. चार दिवस चाललेल्या या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम, ध्यान, व्यक्तिमत्त्व विकास, तणाव व्यवस्थापन, संवाद कौशल्य आणि टीम भावना यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
दि. १० मे रोजी समारोप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी राजुरा नगरपरिषदेचे अध्यक्ष अरुणभाऊ धोटे, रोटरी क्लब राजुराचे सचिव राजू गोखरे, व्यापारी असोसिएशन राजुराचे अध्यक्ष संदीप जैन तसेच नगरसेविका पुनम गिरसावळे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. समारोपावेळी साई इन्शुरन्स कन्सल्टन्सी अँड फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक मनोज माडुरवार यांच्या प्रायोजकत्वातून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन गोपाल सारडा, मनोज माडुरवार, कमल बजाज आणि ओमप्रकाश गुंडावार यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी द आर्ट ऑफ लिविंग राजुरा, रोटरी क्लब राजुरा आणि व्यापारी असोसिएशन राजुरा यांचे विशेष सहकार्य लाभले.
इन्फंट जिझस इंग्लिश स्कूलचे प्रशासकीय अधिकारी अभिजीत धोटे यांनी चार दिवसांच्या कार्यशाळेसाठी हॉल व संपूर्ण व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली. आयोजकांनी त्यांचे विशेष आभार मानले. सेमिनारमध्ये आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक ओमप्रकाश गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील सकारात्मकता, शिस्त आणि सेवा भावनेचे महत्त्व समजावून सांगितले. समारोपावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत या सेमिनारमुळे आत्मविश्वास, मानसिक शांतता आणि नवी ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मनोज माडुरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ओमप्रकाश गुप्ता यांनी मानले.
#ArtOfLiving #YouthEmpowerment #युवा_सशक्तिकरण #ArtOfLivingRajura #StudentDevelopment #PersonalityDevelopment #YogaWorkshop #Meditation #PositiveThinking #LeadershipSkills #RotaryClubRajura #VyapariAssociationRajura #ChandrapurNews #MaharashtraNews #YouthSeminar #InfantJesusSchoolRajura #MotivationForYouth #MentalWellness #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.