Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपी पतीला न्यायालयाची कठोर शिक्षा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रत्यक्षदर्शी पुरावे आणि सीए रिपोर्टच्या आधारे दोष सिद्ध आमचा विदर्भ वृत्तसेवा  कोठारी (दि. ०९ मे २०२६) -         चारित्र्यावर संशय घेऊन पत...
प्रत्यक्षदर्शी पुरावे आणि सीए रिपोर्टच्या आधारे दोष सिद्ध
आमचा विदर्भ वृत्तसेवा 
कोठारी (दि. ०९ मे २०२६) -
        चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी आजीवन सश्रम कारावास अर्थात जन्मठेप आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम (डीजे-१) यांनी मे २०२६ मध्ये हा महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालामुळे कोठारी पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे. ही घटना १२ सप्टेंबर २०२४ रोजी गोंडपिपरी तालुक्यातील मौजा कुडेसावली येथे सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणातील आरोपी धनपाल माधव रामटेके (वय ६० वर्ष) याने पत्नी वंदना धनपाल रामटेके (वय ६० वर्ष) हिच्या चारित्र्यावर संशय घेत चाकूने वार करून तिची हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

         या प्रकरणी फिर्यादी अमर धनपाल रामटेके (वय ३० वर्ष) यांच्या तक्रारीवरून कोठारी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर कोठारी पोलीस स्टेशनचे सपोनी योगेश खरसान यांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच केमिकल अॅनालायझर (सीए) रिपोर्ट यांसारखे महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

        खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता आसिफ शेख यांनी न्यायालयात भक्कम युक्तिवाद केला. सादर करण्यात आलेले प्रत्यक्षदर्शी पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि वैज्ञानिक तपास अहवाल ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी धनपाल रामटेके याला दोषी ठरवले. न्यायालयाने भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत आरोपीला आजीवन सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाच्या तपासात सपोनी योगेश खरसान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर पैरवी अधिकारी म्हणून मपोशि मनीषा गोवर्धन चिवंडे यांनीही प्रभावी कामगिरी बजावत खटल्याच्या सुनावणीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

#KothariPolice #ChandrapurCourt #MurderCase #LifeImprisonment #CrimeNews #ChandrapurNews #Gondpipri #Kudesaoli #PoliceInvestigation #MaharashtraCrime #CourtVerdict #WifeMurderCase #कोठारीपोलीस #चंद्रपूर #गुन्हेवार्ता #जन्मठेप #न्यायालय #पत्नीहत्या #महाराष्ट्रबातम्या #क्राईमन्यूज #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top