Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: साची उपरे विद्यालयात प्रथम; गुरुनानक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा यशोत्सव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी आमचा विदर्भ - अविनाश रामटेके विरूर स्टेशन (दि. ०९ मे २०२६) -     ...
गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
विरूर स्टेशन (दि. ०९ मे २०२६) -
        राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील गुरुनानक विद्यालयाचा यावर्षीचा दहावीचा निकाल ८० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाचे नाव उंचावले आहे.

        यामध्ये विद्यार्थिनी साची सत्यपाल उपरे हिने ८८.२० टक्के गुण मिळवत विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तर विद्यार्थिनी निदा इरफान शेख हिने ८७ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थिनींच्या या यशामुळे गावात तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापक धानोरकर सर, शिक्षक उराडे सर, शिक्षक मोरे सर आणि शिक्षक बेले सर यांनी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
साची सत्यपाल उपरे
        ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पालकांनी विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले. गुरुनानक विद्यालयाने ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. यावर्षीच्या निकालातून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून आगामी काळातही विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

#GurunanakVidyalaya #VirurStation #SSCResult2026 #Class10Result #Rajura #ChandrapurNews #EducationNews #MaharashtraNews #Topper #SachiUpre #NidaSheikh #SchoolResult #RuralEducation #विद्यार्थीयश #दहावीचानिकाल #विरूरस्टेशन #राजुरा #चंद्रपूर #गुरुनानकविद्यालय #शैक्षणिकयश #महाराष्ट्रबातम्या #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top