Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कामगार कायद्यांचे मार्गदर्शन आणि संघटनेची शिकवण एका व्यासपीठावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कार्यकर्ता घडवणारा भारतीय मजदूर संघाचा अभ्यास वर्ग यशस्वीरीत्या संपन्न आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. २१ सप्टेंबर २०२५) -         भ...
कार्यकर्ता घडवणारा भारतीय मजदूर संघाचा अभ्यास वर्ग यशस्वीरीत्या संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. २१ सप्टेंबर २०२५) -
        भारतीय मजदूर संघ चंद्रपूरतर्फे आयोजित दोन दिवसीय अभ्यास वर्ग यशस्वीरित्या संपन्न झाला. या अभ्यास वर्गात कामगार कायदे, पंचपरिवर्तन, संघटनेची रीती-नीती अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात न्यायमूर्ती प्रशांत कुलकर्णी यांनी कामगार कायद्यांवर मार्गदर्शन केले. त्यांनी कामगारांच्या हक्कांबरोबरच कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर अविनाश मुक्कुलवार यांनी पंचपरिवर्तन या विषयावर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांनी समाजपरिवर्तनासाठी कोणते पाच महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे यावर सविस्तर भाष्य केले.

        यानंतर भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ नेते सुधीर घुरडे यांनी कार्यकर्ता कसा असावा या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी संघटनात्मक मूल्ये जोपासून समाजातील समस्यांवर उपाय शोधावेत, असे त्यांनी अधोरेखित केले. तसेच भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ नेते व कोल इंडिया, भारत सरकारचे कोल सेफ्टी मेंबर रमेश बल्लेवार यांनी संघटनेची रीती-नीती व कार्यपद्धती स्पष्ट केली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष बंडु हिरवे यांच्या हस्ते झाले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन जिल्हामंत्री पवन ढवळे यांनी केले. अभ्यास वर्गात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.

        अभ्यास वर्गाच्या यशस्वितेकरिता अध्यक्ष, चंद्रपूर क्षेत्र (कोल) नामदेवजी देशमुख, महामंत्री, चंद्रपूर क्षेत्र (कोल) अंकित धानोरीय, उपाध्यक्ष, चंद्रपूर क्षेत्र (कोल) प्रमोद लेडांगे, अरुण येरगुडे, शुभम जनवार, राईस सय्यद, सुनिल टोंगे, रोहित, प्रदीप पारखी, विल्सन पुल्लूरवार, राहुल दोडेवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कामगार वर्गासाठी ज्ञानवर्धक ठरलेला हा दोन दिवसीय अभ्यासवर्ग सर्वांच्या सहभागामुळे संस्मरणीय ठरला.

#BMSChandrapur #WorkersRights #LabourLaws #Panchparivartan #BMSStudyCamp #UnionValues #EmpoweringWorkers #sudhirghurude #pawandhavale #bhartiyakoylakhadanmajdursangh #bms #coalindia #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top