Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नितीनजी गडकरी यांच्या कडून ब्रह्मपुरीला 2 मिनी व्हेंटिलेटर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खासदार अशोक नेते व माजी आमदार अतुल देशकर यांचा पुढाकार ब्रह्मपुरीकरांच्या वतीने अतुल देशकर यांनी मानले गडकरी साहेबांचे आभार कुमारी पौर्णिमा ...

  • खासदार अशोक नेते व माजी आमदार अतुल देशकर यांचा पुढाकार
  • ब्रह्मपुरीकरांच्या वतीने अतुल देशकर यांनी मानले गडकरी साहेबांचे आभार
कुमारी पौर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
ब्रह्मपुरी मधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यात आरोग्‍य यंत्रणा कमी पडत असताना, व्‍हेंटीलेटर व ऑक्सीजनचा तुटवडा भासत असताना क्षेत्राचे खासदार अशोक नेते व ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार अतुल देशकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या कडे व्हेंटिलेटर देण्याबाबत विनंती केली होती. आज केंद्रीय मंत्री मा.ना.नितीनजी गडकरी यांनी ब्रह्मपुरीसाठी 2 मिनी व्हेंटिलेटर (Bipap) उपलब्ध करून दिले. 

दि.२३ एप्रिल ला खासदार अशोक नेते व माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी सदर 2 मिनी व्हेंटिलेटर IMA हॉल येथे डॉ.सुनील नाकाडे व डॉ. श्रीकांत नागमोती यांच्याकडे व आस्था कोविड रूग्‍णालय येथे डॉ. सुमित जयस्वाल यांच्याकडे रूग्‍णांसाठी सुपूर्द केले.

ब्रह्मपुरी येथे दिलेल्या मदतीबद्दल माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे. ब्रह्मपुरीची परिस्थिती लक्षात घेता अजून मिनी व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची मागणी गडकरी साहेबांकडे केली असल्याचे माजी आमदार अतुल देशकर यांनी संगितले आहे.

या वेळी तहसीलदार पवार साहेब, जि.प माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री क्रीष्णा सहारे, भाजपा नगर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, साकेत भानारकर, भा.ज.यु. मो शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, युवा मोर्चा नगर महामंत्री स्वप्नील अलगदेवें उपस्थित होते. ब्रह्मपुरीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी केलेली ही मदत उल्लेखनीय आहे. या मिनी व्हेंटिलेटरच्या साह्याने रुग्णांना उपचारासाठी मोलाची मदत मिळणार आहे. 



24 Apr 2021

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top