चंद्रपूरला हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 1 ऑगस्ट २०२५) –
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनोना चौक परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबारात बुधासिंग टाक याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या हत्येप्रकरणी फिर्यादी राकेश गौतम तेलंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्रमांक ६१५/२०२५ अन्वये कलम १०३ (१), ३, ५ भारतीय न्याय संहिता-२०२३ आणि कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या
घटनेनंतर मुख्य आरोपी फरार झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामनगर व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त पथकांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे आणि सातत्यपूर्ण तपासानंतर गुन्ह्याचे मुख्य आरोपी सोनुसिंग जितसिंग टाक, रा. जुनोना चौक चंद्रपूर, त्याचा साथीदार लाला उर्फ नैनेश सहा, रा. बाबूपेठ, चंद्रपूर तसेच आरोपींना मदत करणारा सहआरोपी पवन पाटील, रा. बाबूपेठ, चंद्रपूर यांना शिताफीने अटक करण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, वाहने इत्यादी बाबत सखोल तपास सुरू असून, इतर कोणताही गुन्हेगारी समूह या घटनेत सहभागी आहे का याचा देखील तपास करण्यात येत आहे.
#ChandrapurCrimeNews #BallarpurMurderCase #JunonaChowkShooting #RamnagarPoliceAction #CrimeInChandrapur #MurderInvestigation #AccusedArrested #ChandrapurUpdate #GunCrimeIndia #PoliceCrackdown #JusticePrevails #CrimePatrolChandrapur#aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur #ballarpur #ballarpurnews #ballarpurupdate
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.