- लॉकडाउन व कोरोना उपाययोजने संदर्भात तातडीने घेतला आढावा
- रेमडिसिव्हर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठाबाबत संबंधितांना निर्देश
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. मृत्यू दरही वाढलेला आहे जिल्हा प्रशासनाकडून ज्या उपाययोजना करतांना कालावधी लागला असला तरी बऱ्याच प्रमाणात व्यवस्था रुळावर आणण्याचे काम या कालावधीत झालेले आहे.
जिल्ह्यात वुमन्स हॉस्पिटल मध्ये 44 अतिरिक्त बेड वाढविण्यात आले असून कोविड केअर सेंटर मध्ये प्रत्येक तालुकानिहाय 100 बेडची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासह जिल्ह्यात कोविड केअर सेंटर मध्ये तालुकास्तरावर 4000 बेड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी, नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे,अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, अन्न व औषध प्रशासन अधिकारी नितीन मोहिते यासह आरोग्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या संकटाच्या प्रसंगी रुग्णांवर वेळेत योग्य ते उपचार व्हावेत यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्नरत असून येत्या काही दिवसात मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास अतिरिक्त 350 बेड सुरू करण्याचे नियोजित आहे.
शासकीय यंत्रणेवरील भार कमी व्हावा तसेच रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी कोविड काळात खाजगी रुग्णालयांना परवानगी दिली व ती आवश्यकही होती. यामुळे आरोग्य विभागावर येणारा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.
रुग्णाच्या उपचारार्थ बेडची कमतरता भासू नये यासाठी जिल्ह्यातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी व वरोरा मिळून 787 खाजगी रुग्णालयातील बेडला मान्यता देण्यात आलेली आहे.
आज जिल्ह्यात 1022 रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले असून यात नक्कीच दिलासा मिळाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व रुग्णांची परिस्थिती पाहून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे. यामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन चा गैरवापर होऊ नये याची दक्षता सुध्दा घेण्यात येत आहे.
याबरोबरच काही खाजगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लूट होत आहे व त्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे यावर आळा घालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नऊ लोकांची टीम कार्यान्वित केली आहे सदर टीम रुग्णालयाला भेट देऊन योग्य ती तपासणी करीत आहेत.
जिल्हा प्रशासनामार्फत वैद्यकीय सुविधांचे दरपत्रक सादर करण्यात आले आहे,रुग्णाची आर्थिक शोषण थांबावे यासाठी रुग्णालयासमोर तसेच रुग्णालयाच्या दर्शनी भागात दिसेल याठिकाणी सदर दरपत्रक लावण्याच्या सूचना दिल्या तसेच या दरानुसारच रुग्णांनी व नागरिकांनी आर्थिक व्यवहार करावे अशा सूचना सुद्धा त्यांनी यावेळी दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.