Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: धक्कादायक! दारू समजून सॅनिटायझर प्यायले, ७ जणांचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील घटना दारूची हुक्की जीवावर बेतली आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स यवतमाळ (वणी) - दारूचे व्यसन जडलेल्या काहींना दार...

  • यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील घटना
  • दारूची हुक्की जीवावर बेतली
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
यवतमाळ (वणी) -
दारूचे व्यसन जडलेल्या काहींना दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. हा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडला आहे. यात एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या सहाजणांपैकी तिघांचा घरी तर इतरांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. लॉकडाउनमुळे दारूची दुकाने बंद असल्याने रहावले न गेल्याने काही जणांनी दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी पाच मृत व्यक्तीची नाव आहेत ज्याचा सॅनिटीझर पिल्याने मृत्यू झाला आहे. या सर्वांनी काल सॅनिटायझर घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना वणी येखील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वणी शहरातील तेली फैल भागातील दत्ता लांजेवार आणि नूतन पथरकर हे दोघेजण दारुच्या शोधात होते. परंतु, लॉकडाउन काळात दारुची दुकाने बंद असल्यामुळे त्यांची चांगलीच गैरसोय होत होती. या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात दोघेही अपयशी ठरल्यामुळे त्यांनी अखेरीस सॅनिटायजर पिण्याचा निर्णय घेतला. सॅनिटायजर पिऊन दोघेही घरी गेल्यानंतर त्यांच्या छातीत दुखायला लागले. यानंतर शुक्रवारी रात्री या दोघांना कुटुंबीयांनी रुग्णालयात भरती केले. रुग्णालयात काही काळ उपचार घेतल्यानंतर दत्ता आणि नुतन यांना सुट्टी देण्यात आली.

परंतु, मध्यरात्री दोघांच्या छातीत पुन्हा दुखायला लागल्याने त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला. वणी शहरातील अशाच एका घटनेत एकता नगर भागातील संतोष मेहर, गणेश नांदेकर, सुनील ढेंगले, गणेश शेलार आणि एका इसमाने दारु मिळत नसल्यामुळे सॅनिटायजर प्यायल्याचे समोर आले. या सर्वांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीत मृतांच्या नातेवाईकांनी सॅनिटायजर प्यायल्यानंतर त्रास सुरु झाल्याची माहिती दिली. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top