Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा येथे २० ऑक्‍सीजन बेडस् उपलब्‍ध होणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - जिल्‍हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या द़ष्‍टीने जिल्‍हा रूग्‍णालयाला १७ व्‍हें...

मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्‍हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या द़ष्‍टीने जिल्‍हा रूग्‍णालयाला १७ व्‍हेंटीलेटर उपलब्‍ध करून देण्‍या पाठोपाठ माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्‍णालयात स्‍थापित झालेल्‍या कोविड केअर सेंटरला २० ऑक्‍सीजन बेडस् उपलब्‍ध होणार आहे.

जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी सदर ऑक्‍सीजन बेडस् च्‍या खरेदीसाठी १९ लक्ष रू. च्‍या खर्चाला दि. २२ जानेवारी रोजी प्रशासकीय मान्‍यता प्रदान केली आहे. पोंभुर्णा येथील कोविड केअर सेंटरला २० ऑक्‍सीजन बेडस् उपलब्‍ध करण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिका-यांकडे केली व त्‍यांचा पाठपुरावा केला. जिल्‍हा वार्षिक योजनेअंतर्गत सदर २० ऑक्‍सीजन बेडस् च्‍या खरेदीसाठी मंजुरी देण्‍यात आली आहे. पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्‍णालयाची इमारत बांधुन तयार आहे. ही इमारत आवश्‍यक बाबींची पुर्तता करून आरोग्‍य सेवेसाठी जनतेच्‍या सेवेत रूजु करण्‍याबाबत आ. मुनगंटीवार यांचा पाठपुरावा सुरू आहे. नुकतीच त्‍यांनी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकांशी ऑनलाईन बैठकही घेतली. पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्‍णालयात १०० बेडेड कोविड केअर सेंटर सुध्‍दा त्‍यांच्‍या प्रयत्‍नांच्‍या फलस्‍वरूप सुरू करण्‍यात आले आहे.

या आदिवासी बहुल भागातील कोरोनाग्रस्‍त रूग्‍णांना ऑक्‍सीजन बेडस् ची सुविधा उपलब्‍ध व्‍हावी म्‍हणून आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत २० ऑक्‍सीजन बेडस् ला मंजुरी मिळविल्‍याने या भागातील नागरिकांना मोठी सोय उपलब्‍ध होणार आहे. सदर ऑक्‍सीजन बेडस् ४ ते ५ दिवसात रूग्‍णांच्‍या सेवेत रूजु होणार आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top