Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सावली तालुकातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा तडाखा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चक्री वादळामुळे तालुक्यातील अनेक फळबागांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान प्रशासनाने तत्काल पाहणी व पंचनामे करुन मदत जाहीर करावी शेतकऱ्यांची ...

  • चक्री वादळामुळे तालुक्यातील अनेक फळबागांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान
  • प्रशासनाने तत्काल पाहणी व पंचनामे करुन मदत जाहीर करावी शेतकऱ्यांची मागणी
कुमारी पौर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
सावली तालुक्यातील काल झालेल्या चर्की वादळामुळे तालुक्यातील चकपिरंजी येथील अनिल स्वामी यांच्या १५ एकर मधील व त्याचे सोबतच अनेक शेतकऱ्यांचे पावसाच्या तडाख्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. 

चक्रीवादळा मूळे चकपिरंजी येथील शे.वा.स सोसायटी चे अध्यक्ष अनिल स्वामी यांच्या पंधरा एकर जमिनीवरच्या आंब्यांचे ३० ते ४० हजारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे तालुकातील शेतकऱ्यांचे फळ बघायतीची प्रशासनाने पाहणी व पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी  तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top