Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शुल्लक वादात चाकूने भोसकले! आंबेडकर चौकात चाकूने भोसकले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शुल्लक वादात चाकूने भोसकले! आंबेडकर चौकात चाकूने भोसकले आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स  चंद्रपूर / सावली (दि. 14 मे 2025) -        शुल्लक वा...
शुल्लक वादात चाकूने भोसकले! आंबेडकर चौकात चाकूने भोसकले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स 
चंद्रपूर / सावली (दि. 14 मे 2025) -
       शुल्लक वादातून एका तरुणाला चाकूने सपासप वार करून जाग्यावरच ठार केल्याची घटना मंगळवारी (दि. 13) रात्री 9 वाजता केरोडा (मानकापूर) हेटी येथील आंबेडकर चौकात घडली. या घटनेत समीर हरीदास खंडारे (32) या तरुणाचा मृत्यू झाला.

        मिळालेल्या माहितीनुसार, समीर खंडारे हा मजुरीचे काम करीत होता. 13 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता आंबेडकर चौकात रामदास कन्नाके यांच्या दुकानाजवळ समीर, गिरीधर वालदे व त्याचा मुलगा अभय गिरीधर वालदे हे जोरजोरात बोलत होते. त्यातून वाद निर्माण झाला आणि रात्री 9.30 वाजता वाद विकोपाला जाऊन समीरवर चाकूने सपासप वार करण्यात आले. समीर जागीच ठार झाला. अमित शेट्टे या व्यक्तीने मृतकाच्या मोठ्या भावाला घटनेची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन त्याने पाहिले की समीर रक्ताने माखलेल्या स्थितीत पडला होता. त्याच्या शर्ट आणि पॅन्टवर चाकूचे वार असल्याचे स्पष्ट दिसत होते. मृतकाच्या भावाने तत्काळ सावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

        सावली पोलिसांनी तक्रारीची नोंद करून तपास सुरू केला. गिरीधर वालदे व त्याचा मुलगा अभय वालदे हे दुचाकीवरून व्याहाड येथे गेले व साईनाथ शेडमाके आणि पियुष लाटेलवार या मित्रांना बोलावून समीरला चाकूने भोसकले, अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली. SDPO सावली यांनी श्वान पथक पाचारण केले व आरोपींच्या मोबाईल लोकेशनद्वारे गिरीधर वालदे (50), अभय वालदे (23), विधी संघर्ष बालक साहिल शेडमाके (16) आणि पियुष लाटेलवार (16) या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top