Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "तुलाना गावातील अभिनय मडावीची घवघवीत कामगिरी - 91.20% गुणांसह यशस्वी!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"तुलाना गावातील अभिनय मडावीची घवघवीत कामगिरी - 91.20% गुणांसह यशस्वी!" आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. १५ मे २०२५) -        ...
"तुलाना गावातील अभिनय मडावीची घवघवीत कामगिरी - 91.20% गुणांसह यशस्वी!"
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १५ मे २०२५) -
        राजुरा तालुक्यातील तुलाना या छोट्याशा गावातील अभिनय दिनेश मडावी याने महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील दहावी बोर्डाच्या परीक्षेत 91.20% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. अभिनय हा या गावातील पहिला विद्यार्थी आहे ज्याने 91.20% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

        या उल्लेखनीय यशाबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. परिषद तालुकाध्यक्ष मनोज आत्राम, तालुका सचिव दिपक मडावी आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अभिनयला पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विशेष म्हणजे, अभिनयने कोणतेही शिकवणी वर्ग न लावता स्वअभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. त्याने यशाचे श्रेय आपल्या वडील दिनेश मडावी, आई सपना मडावी, मोठे बाबा सचिन मडावी तसेच शाळेतील मुख्याध्यापक मेश्राम सर, वर्ग शिक्षिका बेलोरकर मॅडम आणि इतर शिक्षकांना दिले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top