Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श - जिल्हा परिषद हायस्कुल राजुरा"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श - जिल्हा परिषद हायस्कुल राजुरा" यंदाही 87.12% निकाल! ''संस्कृती करमनकर ठरली शाळेत प्रथम!...
"गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श - जिल्हा परिषद हायस्कुल राजुरा"
यंदाही 87.12% निकाल! ''संस्कृती करमनकर ठरली शाळेत प्रथम!''
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १५ मे २०२५) -
        निकालाची परंपरा कायम राखत यावर्षीही जिल्हा परिषद माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय राजुराचा निकाल 87.12% लागला आहे. या शैक्षणिक सत्रात इयत्ता 10 वी मध्ये एकूण 101 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधून 8 विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले, 31 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत, 42 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत, तर 7 विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत यश मिळवले.

        शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती करमनकर हिने 87.40% गुणांसह शाळेत पहिला क्रमांक मिळवला, नैना ढुमणेने 85.20% गुणांसह दुसरा, तर अंजली येगेवार हिने 79.60% गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला आहे. स्पर्धात्मक युगातदेखील जिल्हा परिषद हायस्कूल राजुरा शैक्षणिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा कायम ठेवत आहे. निकालानंतर शाळेचे मुख्याध्यापक किशोर उईके आणि सर्व शिक्षक वृंदाने प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top