Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सुडबुद्धीने खोट्या गुन्ह्यांवर मनसेचा आक्रमक विरोध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुडबुद्धीने खोट्या गुन्ह्यांवर मनसेचा आक्रमक विरोध मुख्यमंत्री व IG कडे तक्रार आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. 10 एप्रिल 2025) -    ...
सुडबुद्धीने खोट्या गुन्ह्यांवर मनसेचा आक्रमक विरोध
मुख्यमंत्री व IG कडे तक्रार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. 10 एप्रिल 2025) -
        चंद्रपूर (सावली) – सावली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक, महानिरीक्षक डॉ. भुजबळ तसेच राष्ट्रीय आणि राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

        7 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या हिरापूर टोल नाका शाखेच्या उद्घाटनासाठी मनसेचे पदाधिकारी अमन अंधेवार, राजू कुकडे, महेश वासलवार, आणि सुनील गुढे सावली तालुक्यात गेले होते. परतीच्या मार्गावर खेडी फाटा परिसरात एक हायवा ट्रक चालक बेदरकारपणे ट्रक चालवत असल्याचे निदर्शनास आले. सदर चालक मद्यधुंद स्थितीत होता आणि ट्रकमध्ये रेती देखील होती.

        या घटनेची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी RTO निरीक्षक पायघन आणि सावली पोलीस स्टेशनचे PSI मुसळे यांना दिली. दरम्यान, ट्रकजवळ एक ऑटो अपघातग्रस्त झाला आणि त्याचा चालकही दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. मनसे कार्यकर्त्यांनी ऑटो उभा करून मदत केली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी ट्रक स्टेशनला हलवला व ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर सावली पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरवर दबाव टाकून मनसे पदाधिकाऱ्यांविरोधातच तक्रार लिहून घेतली आणि खोटा गुन्हा दाखल केला.

        या विरोधात, मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, पोलीस प्रशासन, व मानवाधिकार आयोगांकडे तक्रार दाखल केली. मनसे उपाध्यक्ष राजू कुकडे आणि वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top