attempted trespass
आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 10 एप्रिल 2025) -
तुकुम विभाग क्रमांक 1 मधील स्टेट बँक कॉलनी येथे वडिलोपार्जित जमिनीत राहणाऱ्या पंचफुला मडावी कुळमेथे या आदिवासी कुटुंबावर अतिक्रमणाचा आणि धमक्यांचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बल्लारपूर येथील काही व्यक्तींकडून या कुटुंबास त्यांच्या जमिनीतून आणि घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुळमेथे कुटुंब या जमिनीत राहत आहे. मात्र, अभय सिंग कचवा, कमल सिंग कचवा, दिलीप वावरे, बादल खुशाल उराडे, तेजस दवे आणि मोना दवे या व्यक्तींनी पैशाच्या जोरावर धमक्या देऊन जमिनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकारामुळे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहे.
या प्रकरणाची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात देण्यात आली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकाराविरोधात शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिस प्रशासनाला कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, आदिवासी कुटुंबाच्या हक्काच्या जमिनीवर बळकावण्याचा प्रयत्न म्हणजे अन्याय असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.