चंद्रपूर युवक काँग्रेसमध्ये नवचैतन्याची भर!
शंतनू धोटेंच्या नेतृत्वात तरुणांचा विश्वास वाढतोय!
बेरोजगारी, महागाई, अराजकतेविरोधात युवकांचा पुढाकार! जिल्ह्यातील अनेक तरुणांचा युवक काँग्रेसमध्ये उत्स्फूर्त प्रवेश!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 9 एप्रिल 2025) -
चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू अजय धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गावांतील अनेक कर्तबगार युवकांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात शंतनू धोटे व युवक काँग्रेसचे माजी सचिव राजीव खाजांजी यांच्या हस्ते नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे काँग्रेस दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले. यावेळी महासचिव हर्षल येलमुले यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित होते.
शांतनू धोटे यांनी यावेळी सांगितले की, युवक काँग्रेसमध्ये युवकांना खऱ्या अर्थाने आवाज व दिशा मिळते, त्यामुळे विविध पक्षांतील तरुण आता युवक काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग दाखवत आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई, जातीयवाद आणि सामाजिक अराजकता यांमुळे त्रस्त होऊन युवकांनी युवक काँग्रेसच्या मानवतावादी विचारधारेवर विश्वास ठेवत पुढे येण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये वेदांत प्रदीप देठे, आयुष बंडू सोनटक्के, श्रीनाथ लेटावार, चैतन्य पांडे, अमोल अड्बाले, तेजस देवगडे, नवीन एगुले, समशेर शाह, जय पेटला, शरद येड्लावार, जतीन पळ, क्रिष्णा तवारी, मोहम्मद अल्तमास शाह, पियुष गुडे, भारत कांबटकर, युगल मडावी, सिद्धार्थ कोंडागुरला यांच्यासह अनेक युवकांचा समावेश होता.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.