Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना येथे महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात आवाज
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना येथे महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात आवाज आमदारांसमोर मांडला त्रासाचा पाढा आमचा विदर्भ - दीपक शर्मा  कोरपना (दि. 9 एप्रिल 2025) -   ...
कोरपना येथे महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात आवाज
आमदारांसमोर मांडला त्रासाचा पाढा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
कोरपना (दि. 9 एप्रिल 2025) -
        कोरपना तालुक्यात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट वाढला असून त्याचा थेट परिणाम अनेक कुटुंबांवर होत आहे. गावागावांत अनाधिकृत लोकांकडून घरपोच दारू पोहचवली जात असल्याने तरुण पिढी वेगाने व्यसनांच्या गर्तेत अडकत आहे. यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर कोरपना शहरातील वार्ड क्रमांक 14, 15, 16, 17 आणि 2 मधील महिलांनी एकत्र येत अवैध दारू विक्रीविरोधात एल्गार पुकारला. गावाला भेट देण्यासाठी आलेले आमदारा समोर महिलांनी थेट आपल्या समस्या मांडल्या. त्यांनी पोलिस निरीक्षक राजपूत यांना अवैध दारू बंद करण्याचे आदेश दिले.

मात्र, महिलांच्या मते ही कारवाई वरवरचीच असून विक्रेते अजूनही खुलेआम दारू विकत आहेत. महिलांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन दारू व्यवसाय बंद करण्याची मागणी केली व अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. नगरसेविका सविता तुमराम यांच्या नेतृत्वात नायजा शेख, रशिया शेख, सुनंदा चव्हाण, विनिता सोमल, विना ठाकूर, ज्योती चिंतलवार, संगीता कुलवार, संगीता तोडासे, सुमन परचाके या महिलांनी ठाणेदारांसमोर आपली व्यथा मांडली. सध्या कोरपना परिसरात सट्टा-पट्टी, अवैध दारू व्यवसाय, आणि त्यामागे असलेले कथित राजकीय आशीर्वाद हे चर्चेचा विषय ठरत आहेत. महिलांनी मागणी केली आहे की, केवळ कारवाई नव्हे, तर कारवाईचा परिणाम दिसावा. पोलिसांनी कारवाई करून वाहन जप्ती व कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top