Plantation
"10 वर्षांचा तनिश - हिरवळीचा हिरो!"
वृक्षारोपणाचा संकल्प, संवर्धनासाठी समर्पण
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 9 एप्रिल 2025) -
गडचांदूर येथील फक्त 10 वर्षाचा तनिश पोतनूरवार याने ‘100 वृक्ष लागवडीचा संकल्प’ करत पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले आहे. याच कार्याची दखल घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने त्याचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तनिशने आतापर्यंत 46 झाडे स्वतः लावली असून, त्यांच्या निगा राखण्याचे काम देखील तो मनापासून करत आहे. त्याच्या आई सौ. माधुरी पोतनूरवार यांच्या प्रेरणेतून त्याच्यात हे पर्यावरणप्रेम निर्माण झाले आहे. वाढते तापमान, प्रदूषण आणि हवामान बदल यामुळे भविष्यासमोर निर्माण होणाऱ्या संकटांबाबत जाणीव ठेवत तनिशने आपल्या गावातील मोकळ्या जागांवर झाडे लावण्याचा उपक्रम राबवला आहे. याप्रसंगी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महिला विभागाच्या प्रमुख सौ. उषा टोंगे, उपाध्यक्षा अरुणा सालवटकर, सचिव विजया नामेवार, सुलभा कुरेकार, शीतल धोटे, स्मिता विरुटकर, अपर्णा उपलंचीवार आणि सौ. माधुरी पोतनूरवार उपस्थित होत्या.
“बालवयात पर्यावरणप्रेम जोपासणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तनिशचा संकल्प भविष्यातील पिढीला प्रेरणा देणारा ठरेल. प्रत्येकाने याप्रकारे पुढाकार घेणं गरजेचं आहे.” असे सौ. उषा टोंगे म्हणाल्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.