Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्टमध्ये तरुणीवर अमानुष अत्याचार तिघांविरोधात गुन्हा दाखल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Inhuman torture on a young woman ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्टमध्ये तरुणीवर अमानुष अत्याचार तिघांविरोधात गुन्हा दाखल आमचा विदर्भ -  दीपक शर्मा  ...
Inhuman torture on a young woman
ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्टमध्ये तरुणीवर अमानुष अत्याचार
तिघांविरोधात गुन्हा दाखल
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. 9 एप्रिल 2025) -
        ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्टमध्ये एका तरुणीवर नशीली पदार्थ देऊन बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने रामनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिला जबरदस्तीने रिसॉर्टमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अमानुष कृत्य केले. पीडितेच्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्तार शाह नामक आरोपीने आपल्या पत्नीच्या नावाने काम असल्याचे सांगून तरुणीला ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्टमध्ये नेले. तिथे एका खोलीत तिला दोन कॉफीपैकी एक देण्यात आली, जिच्यामध्ये नशेचे औषध मिसळले होते. नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

        या घटनेत नुरानी अहमद गुलाम नबी व मुख्तार गुलाम नबी यांनी पीडितेला व तिच्या कुटुंबाला धमकावले. भीतीपोटी काही दिवस ही घटना लपवण्यात आली. मात्र सततच्या धमक्यांनंतर पीडितेने तिच्या पालकांना माहिती दिली आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. रामनगर पोलिसांनी आरोपींविरोधात IPC 2023 चे कलम 64, 115(2), 351(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सध्या तिन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top