Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रस्त्यावर अचानक आलेल्या सायकल स्वारामुळे स्कार्पिओ पलटी; चालक ठार, सहकारी गंभीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रस्त्यावर अचानक आलेल्या सायकल स्वारामुळे स्कार्पिओ पलटी; चालक ठार, सहकारी गंभीर आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सावली (दि. 17 मे 2025) -     ...
रस्त्यावर अचानक आलेल्या सायकल स्वारामुळे स्कार्पिओ पलटी; चालक ठार, सहकारी गंभीर
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली (दि. 17 मे 2025) -
        सावली तालुक्यातील व्याहाड येथे दुर्दैवी अपघात घडला आहे, ज्यामध्ये स्कार्पिओ चालकाचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली येथून वाहन क्रमांक MH 33 AC 8712 ही स्कार्पिओ सावली तालुक्यातील व्याहाड मार्गे येत असताना अचानक सायकल स्वार रस्त्यात आला. सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. स्कार्पिओचा मागील टायर फुटल्याने वाहन पलटी झाले. या भीषण अपघातात चालक अनिरुद्ध कोवे वय 25 वर्षे, रा. केरोडा यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनातील अन्य सहकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सावली पोलीस या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत. सायकलस्वाराचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top