शेतकऱ्यांच्या समस्यांना दिलासा; पावसाळ्यापूर्वी पांढरपोवणी-चंदनवाही रस्त्याची दुरुस्ती
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 17 मे 2025) -
तालुक्यातील पांढरपोवणी ते चंदनवाही पांदण रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या समस्यांचा अखेर निकाल लागला आहे. भाजपा तालुका महामंत्री दिलीप गिरसावळे यांच्या पुढाकाराने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून वाहून जाण्याची भीती होती. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्यांचे गांभीर्य ओळखून गिरसावळे यांनी स्थानिक शेतकऱ्यांसह रस्त्याची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर इंजिनीयर मेंढे मॅडम यांच्याशी संपर्क साधून रस्त्यावरील पाईप बसविण्याचे काम करण्यात आले. यामुळे येत्या पावसाळ्यात रस्ता सुरक्षित राहील आणि शेतकऱ्यांना वाहतूक समस्येचा सामना करावा लागणार नाही.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.