Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बॅनरबाजीच्या उत्सवात ''जास''नामाच्या कुत्र्याची एन्ट्री!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बॅनरबाजीच्या उत्सवात ''जास''नामाच्या कुत्र्याची एन्ट्री! "राजुरात बॅनरबाजीचा महासण सुरू – कुत्र्यांचाही हक्क राखला!...
बॅनरबाजीच्या उत्सवात ''जास''नामाच्या कुत्र्याची एन्ट्री!
"राजुरात बॅनरबाजीचा महासण सुरू – कुत्र्यांचाही हक्क राखला!"
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १८ मे २०२५) -
        राजुरा शहरात हल्ली बॅनरबाजीचा नवा ट्रेंड जोर धरू लागला आहे. नेते, कार्यकर्ते आणि आता तर मुक्या जनावरांचेही वाढदिवस बॅनरवर साजरे होऊ लागले आहेत. ताज्या प्रकरणात मॉर्निंग ग्रुपच्या वतीने 'साज' नामक कुत्र्याचा वाढदिवस शहरातील संविधान चौकात आणि जुना बस स्टॅन्ड ते संविधान चौकापर्यंत महामार्गाच्या मधा मधात बॅनर लावून साजरा केला. होय, तुम्ही बरोबर वाचलंत! साज नामक कुत्र्याचा वाढदिवस बॅनरवर!

        एकीकडे शहरातील अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असताना, बॅनरबाजीने सण, कार्यक्रम, वाढदिवस चौकाचौकांमध्ये साजरे केले जात आहेत. तहसील कार्यालयापासून संविधान चौकापर्यंत मधल्या काळात बँनरबाजीला ऊत आले आहे. 

        रस्त्याच्या मधोमध लावलेले बॅनर अपघातास कारणीभूत ठरत आहे. नगर परिषदेच्या परवानगीशिवाय बॅनर लावले जात आहेत काय? नगर परिषदेने कोणत्या नियमाप्रमाणे अरुंद रस्त्याच्या मधोमध बॅनर लावण्याची परवानगी दिली जेणेकरून वाहतुकीला अडथळा होईल. अपघाताची शक्यता वाढत असताना प्रशासन झोपेत आहे की बॅनरवर शुभेच्छा देणाऱ्या नेते, नेत्यांचे कार्यकर्ते कि मुक्या प्राण्यांसोबत सेल्फी काढण्यात गुंतले आहे, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

        शहरातील नागरिकांचे मत आहे की, बॅनरबाजीसाठी ठराविक ठिकाणे निश्चित करावीत आणि नेते, नेत्यांच्ये कार्यकर्ते, मुक्या जनावरांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम त्यांच्या घरच्या अंगणात साजरे करावेत. कारण शहराच्या रस्त्यांना 'हॅप्पी बर्थडे'चा सण साजरा करण्यापेक्षा वाहतुकीचे नियमन अधिक आवश्यक आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top