Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 'भारतीय जवानांच्या सन्मानार्थ बल्लारपूरात भव्य तिरंगा यात्रा'
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'भारतीय जवानांच्या सन्मानार्थ बल्लारपूरात भव्य तिरंगा यात्रा' 'वंदे मातरम्! भारत माता की जय! घोषणांनी दुमदुमले बल्लारपूर' ...
'भारतीय जवानांच्या सन्मानार्थ बल्लारपूरात भव्य तिरंगा यात्रा'
'वंदे मातरम्! भारत माता की जय! घोषणांनी दुमदुमले बल्लारपूर'
'जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित: आ. सुधीर मुनगंटीवार'
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. १८ मे २०२५) -
        देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावून भूदल, नौदल आणि वायुसेनेतील जवान सेवा करतात. देशावर कुठल्याही आतंकवादी दृष्ट प्रवृत्तींना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी आपले जवान सदैव सज्ज असतात. या जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
       'मिशन सिंदूर'च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ बल्लारपूर शहरात सात किलोमिटर लांब तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी आ.श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. बल्लारपूर येथील काटा गेट डब्लूसीएल येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. तिरंगा यात्रेदरम्यान बल्लारपूर शहर 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' च्या जयघोषाने दुमदुमले. सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सर्वधर्मीय समाज बांधव आणि आबालवृद्ध नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रारंभी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. हातात राष्ट्रध्वज, घोषणांनी आसमंत दुमदुमवणारे तरुण, महिलांची सक्रिय उपस्थिती, विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग हे या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले.
माजी सैनिकांचा सत्कार
        श्री.पांडुरंग हेमके, वीर पत्नी संगीताताई इंगळे, श्री सहदेव रामटेके, माजी सैनिक विजय शेंडे, मनोज ठेंगणे, हवालदार वीर बहादुर सिंग, जगदीश सिंग, मनोज यादव, श्री विश्वेश्वर सरोज, जन बहादुर सिंग सरोज आदी माजी सैनिकांचा सत्कार आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

सर्वधर्मीय गुरूंचा सत्कार
        भंतेजी भागीरथ, अल्ताफ भाई, मनीषजी महाराज, सादिक जवेरी, सुनील पास्टर, दलजीत सिंह कलसी आदी सर्व धर्मीय गुरुंचा सत्कार आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top