'योगासनांपासून लाठीकाठीपर्यंत – शिबीरार्थ्यांचा आत्मविश्वास'
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १८ मे २०२५) -
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीनुसार राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात ६ मे ते १६ मे दरम्यान आयोजित श्री गुरुदेव निवासी सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या शिबिरात शिबीरार्थींनी योगासने, लाठीकाठी, दांडपट्टा, मनोरे, साखळदंड, लेझीम कवायती अशा विविध प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवा मंडळ, चंद्रपूरचे जिल्हा प्रचार प्रमुख रुपलालदादा कावळे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अँड. वामनराव चटप, अँड. सुदर्शन निमकर, आ.शि.प्र.मं. राजुराचे सचिव अविनाश जाधव, श्री शिवाजी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख बबन उरकुडे, राजुरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, रोटरी क्लब अध्यक्ष सारंग गिरसावळे, मराठा सेवा संघ अध्यक्ष दिनेश पारखी, छावा फाऊंडेशन अध्यक्ष आशीष करमरकर, डॉ. अरविंद ठाकरे, केशव ठाकरे, सुमन जेंगठे, सरोजनी हिवरे, महिला प्रतिनिधी, हभप स्वामिनी गौरीताई विटोले, नागपूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शिबीरार्थींनी भर पावसात न घाबरता योगासने, लाठीकाठी, दांडपट्टा, साखळदंड, लेझीम व इतर कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे लाठीकाठीला आग लावून सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. शिबिरातील लेखी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांक, उत्कृष्ट शिबीरार्थी अशा विविध गटांमध्ये पुरस्कार देऊन शिबीरार्थींचा गौरव करण्यात आला. शंकर बापूजी लांडे स्मृती प्रित्यर्थ बापूजी पा. लांडे आणि योगेश लांडे यांच्या वतीने सन्मानचिन्ह व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. संचालन प्रकाश उरकुंडे तर प्रास्ताविक मोहनदास मेश्राम राजुरा तालुका सेवाधिकारी यांनी व आभार बादल बेले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जहीर खान, सरचिटणीस, दादाजी झाडे, कोषाध्यक्ष, रामदास चौधरी, प्रचार प्रमूख, हभप शैलेश कावळे, परशुराम साळवे, भजन प्रमूख, निखिल गिरी, युवा प्रमूख, सुरेश बेले, रामप्रसाद बुटले, देविदास वांढरे, प्रसिध्दी प्रमुख, प्रमोद साळवे, अनिल चौधरी, राजेंद्र मालेकर, परशुराम साळवे, उत्तम अवघडे, उज्वल शेंडे, गणेश कुडे, रामदास चौधरी, मारोतराव सातपुते, बाळासाहेब गोहोकार, लोमेश मडावी, प्रतिभा बोढे, नलिनी मेश्राम, सुवर्णा कावळे, अश्विनी वांढरे, शांताबाई लांडे, विमलबाई उरकुंडे, आनंदराव वडस्कर, गोपाळा बुरांडे, गजानन घुगुल, महादेव पोटे, गजेंद्र ढवस, शंकर थेरे तसेच राजुरा तालुक्यातील शेकडो गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
नऊ दिवसांच्या विश्रांती नंतर समारोपीय कार्यक्रमात मुसळधार पावसाने लावली हजेरी......
शिबीरार्थ्यानी अथक परिश्रम घेऊन मुख्य प्रशिक्षक हभप स्वामिनी गौरी विटोले, स्नेहल राऊत, चेतन अंभोरे यांच्या मार्गदर्शनात विवीध योगासने, प्राणायाम, लाठीकाठी, दांडपट्टा, मनोरे, साखळदंड, लेझीम कवायत आदिंचा सराव केला. परंतु अचानक आलेल्या पावसामुळे परिश्रमावर पाणी न फेरता भर पावसात भिजून शिबीरार्थ्यानी आपले प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पालकांनी या शिबीराविषयी समाधान व्यक्त केले. उत्तम नियोजन व उपलब्ध सोयी सुविधा मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.