Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आरोग्य हेच खरे धन - डॉ. मंगेश गुलवाडे यांचे आरोग्य जनजागृती कार्य
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आरोग्य हेच खरे धन - डॉ. मंगेश गुलवाडे यांचे आरोग्य जनजागृती कार्य समाजाच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे चंद्रपूरमध्ये भव्य रोग निदान शिबिर संपन...
आरोग्य हेच खरे धन - डॉ. मंगेश गुलवाडे यांचे आरोग्य जनजागृती कार्य
समाजाच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे
चंद्रपूरमध्ये भव्य रोग निदान शिबिर संपन्न
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 20 मे 2025) -
        इंडियन रेड क्रॉस सोसायटी, संत आंद्रेया चर्च आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आणि रुग्णांना मोफत औषधे वितरित करण्यात आली. या शिबिरात हृदय, कान-नाक-घसा, व त्वचाविकारांची तपासणी, रक्त तपासणी, थायरॉईड, हिमोग्लोबिन, सिकल सेल, लिव्हर व किडनी लॅबोरेटरी तपासण्या, स्त्रियांचे मासिक पाळी संबंधित आजार, तोंडाचे आजार, स्तनातील गाठी व कॅन्सर तपासणी सोबतच निशुल्क औषधी वितरण करण्यात आले. 

        या शिबिरात विशेष मार्गदर्शन डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. त्यांनी आरोग्य जनजागृतीचा संदेश दिला आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. उपस्थितांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. शिबिरात डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. राजीव देवइकर, डॉ. सत्यनारायण दुधीवार, डॉ. बाल मुकुंद पालीवाल, डॉ. प्रियंका पालीवाल, डॉ. प्रदीप वरघणे, डॉ. आशिष बारब्दे, डॉ. ट्विंकल ढेंगळे, डॉ. पीयूष मेश्राम, डॉ. गार्गी (GMC), डॉ. दिक्षा (GMC), डॉ. अभिजीत (GMC) यांनी सहकार्य केले. 

        शिबिराच्या यशस्वितेकरिता काजल विश्वास, नताशा देवघरे, वैष्णवी सहारे, सुभाष मुरस्कर, आरिफ शेख, आणि विनोद पातुर्डे यांनी परिश्रम घेतले. शिबिराद्वारे अनेक गरजू रुग्णांना वेळेत निदान व उपचार मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांनी अशी आरोग्य शिबिरे समाजाच्या हितासाठी उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top