Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पोक्सो अंतर्गत कडक कारवाई १३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचारप्रकरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोक्सो अंतर्गत कडक कारवाई १३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचारप्रकरण मुख्य आरोपीस २० वर्ष, सहआरोपीस ५ वर्ष कारावास आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्र...
पोक्सो अंतर्गत कडक कारवाई
१३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचारप्रकरण
मुख्य आरोपीस २० वर्ष, सहआरोपीस ५ वर्ष कारावास
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २१ मे २०२५) -
        चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका अत्यंत गंभीर गुन्ह्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीस पोक्सो कायद्यान्वये २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्याला गुन्हा करण्यास मदत करणाऱ्या ३० वर्षीय महिलेसही ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. ही घटना जानेवारी २०२० मध्ये घडली होती. आरोपीने आपल्या महिला मित्राच्या मदतीने पीडित मुलीला घरी बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी श्रीमती मेघा गोखरे यांनी सखोल पद्धतीने केला. त्यांनी न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर, आज दिनांक २१ मे २०२५ रोजी, विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा जिल्हा न्यायाधीश-३, चंद्रपूर मा.पी.जी. भोसले यांच्या न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली.

मुख्य आरोपीस:
  • भादंवि कलम ३७६ (२)(एन) अंतर्गत १० वर्ष सश्रम कारावास व द्रव्य दंड,
  • भादंवि कलम ३७६ (३) अंतर्गत २० वर्ष सश्रम कारावास व द्रव्य दंड
  • पोक्सो कायदा कलम ६ अंतर्गत २० वर्ष सश्रम कारावास व द्रव्य दंड
महिला सहआरोपीस:
  • भादंवि कलम ३५४ (अ)(१)(आय) अंतर्गत ३ वर्ष सश्रम कारावास व द्रव्य दंड
  • पोक्सो कायदा कलम ८ अंतर्गत ५ वर्ष सश्रम कारावास व द्रव्य दंड
        या खटल्यात शासनाची बाजू जिल्हा सरकारी वकील आसिफ शेख यांनी प्रभावीपणे मांडली. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.वा. १५२९ मधुराज रामानुजवार यांनी पैरवी अधिकारी म्हणून व सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश हिवसे (ठाणेदार, पो.स्टे. पडोली) यांनी दत्तक अधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top