Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ''महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार - खऱ्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा!''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
''महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार - खऱ्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा!'' ४०० युवकांना रोजगार प्रशिक्षण, १८५ मान्यवर सन्मानित यहोव...
''महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार - खऱ्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा!''
४०० युवकांना रोजगार प्रशिक्षण, १८५ मान्यवर सन्मानित
यहोवा यिरे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. २६ मे २०२५) -
        प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे एक दिवसीय "शिका, कमवा व प्रगती करा" या उपक्रमांतर्गत रोजगार व उद्योग प्रशिक्षण शिबिर व महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या उपक्रमाचे आयोजन यहोवा यिरे फाउंडेशन, रेल्वे याञी एकता मजूर संघ, राष्ट्रीय उद्योग भारत व पर्यावरण संवर्धन व विकास समिती, महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
        या कार्यक्रमात ४०० पेक्षा अधिक बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात आले, तसेच १८५ उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक व सूत्रधार डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांनी आतापर्यंत २५०० हून अधिक युवकांना रोजगार दिला असून, ३५,००० च्या आसपास उद्योजक तयार केल्याचा उल्लेख या वेळी करण्यात आला. त्यांचे कार्य पाहून सर्व मान्यवरांनी डाॅ. बोरकुटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष मुख्य अतिथी आणि प्रमुख पाहुण्यांचा सन्मान
        कार्यक्रमाचे विशेष मुख्य अतिथी म्हणून मराठी चित्रपटातील रांगडा मुवी फेम अभिनेत्री कु. मयुरी नव्हाते, ग्लोबल एक्सलन्स मिसेस युनिव्हर्स महाराष्ट्र सौ. अनुरिता ढोलकीया यांच्या हस्ते राष्ट्रीय उद्योग संघटन, दिल्ली सुनील कुमार मांडवे, शिक्षण विभाग, नागपूर सहाय्यक आयुक्त श्रीमती गिरिजाताई उईके, राम सामाजिक शैक्षणिक संस्था लातूर सचिव शेषराव अजगरे, आदिवासी दलित मित्र व पर्यावरण संवर्धन व विकास समिती अध्यक्ष डी. के. आरीकर, राष्ट्रीय प्रधान जनजाती उत्थान संघटन नवी दिल्ली प्रांताध्यक्ष डॉ. देव कन्नाके, रेल यात्री एकता मजदूर संघ अकोला अध्यक्ष नंदगोपाल पांडे,  महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र अमरावती प्रशिक्षक सौ. निता जोशी, बिझनेस कोच मुंबई श्री. दत्ता, चंद्रपूर जिल्हा सहकार क्षेत्र लेखा अधिकारी राहुल जोगी, चंद्रपूर जिल्हा सहकार क्षेत्र फेडरेशन श्री. मस्के, माहिती अधिकार पोलिस मित्र तुळसिराम जांभुळकर, विदर्भ नागरी/ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कर्मचारी संघ अध्यक्ष अशोक पिसे, माहिती अधिकार पोलिस मित्र महिला अध्यक्ष सौ. शिल्पा बनपूरकर, राष्ट्रीय उद्योग भारत अमरावती श्री. तांबे, दैनिक नॅशनल संदेश चे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक शर्मा, आमचा विदर्भ न्यूज पोर्टलचे संपादक अनंता गोखरे, पत्रकार कु. अश्विनी पुरी, पत्रकार सौ. योगिता पाटेकर, डॉ. नितु सिंग चव्हाण नागपूर, डॉ. रिचा झाझरीया नागपूर, फिल्म निर्माता अलोक शर्मा, पत्रकार अनिष चौरडिया, पत्रकार फुलचंद भगत, रेल यात्री एकता मजदूर संघ उपाध्यक्ष ललित पांडे, देशोन्नती महाव्यवस्थापक रितेश नायर, कलाजीवन बहुउद्देशीय संस्था ढंगा वरूड अध्यक्ष डॉ. युवराज ठाकरे, यहोवा यिरे फाउंडेशन चंद्रपूर अध्यक्ष कु. एलिजा बोरकुटे, अहिल्यानगर विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सौ. मनिषा वि. शिंदे, यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह चेअरमन सचिन एच. पानघाटे, चंद्रपूर मेडिकल असोसिएशन अध्यक्ष सुनिल कुमार, काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य सचिव विजय नळे, हॅलो चंदा न्यूज पोर्टल चे शशिकांत ठक्कर, कलम मांगे इन्साफ पोर्टल चे स. रमजान अली यांना महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार देण्यात आला. तसेच अनेक इतर मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत हा रोजगार व उद्योग प्रशिक्षण व पुरस्कार सोहळा पार पडला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top