Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "महिन्याभरातच गट्टू खचले, ट्रक गट्टूत अडकला!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"महिन्याभरातच गट्टू खचले, ट्रक गट्टूत अडकला!" नित्कृष्ट दर्जाचे काम उघडकीस आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. २८ मे २०२५) -    ...
"महिन्याभरातच गट्टू खचले, ट्रक गट्टूत अडकला!"
नित्कृष्ट दर्जाचे काम उघडकीस
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. २८ मे २०२५) -
        स्थानिक पंचायत समिती संविधान चौकापासून रामपूरच्या सास्ती टी पॉईंटपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गट्टू (कॉनक्रिट ब्लॉक्स) बसवण्याचे काम मागील दोन महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या कामामध्ये ठेकेदाराकडून नियमानुसार प्रक्रिया न पाळता थेट गट्टू बसवण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.

        विशेष म्हणजे, नाका क्र. ३ जवळील भाजप कार्यकर्ते महेश रेगुंडावार यांच्या ऑटोमोबाईल दुकानासमोर सुद्धा गट्टू लावण्यात आले होते. नियमानुसार, गट्टू बसवण्यापूर्वी रस्ता समतल करून गिट्टी व रेती घालणे आवश्यक असते. मात्र, येथे थेट माती उपसून गट्टू लावण्यात आले. यामुळे दर्जाहीन कामाची झलक लवकरच समोर आली. माहितीनुसार, नुकतेच एका ट्रकचे पुढचे चाक अशाच नित्कृष्ट गट्टूमध्ये खचून जमिनीत घुसला. यामुळे ना केवळ वाहन चालकाला त्रास सहन करावा लागला, तर दुकानातही अडथळा निर्माण झाला.
        या घटनेनंतर परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी हे काम ‘एस्टीमेट’नुसार आणि योग्य पद्धतीने करावे, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत दर्जेदार काम होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे देयक रोखावे, अशी जोरदार मागणी सध्या होत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top