Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूरच्या भूमीतून उठलेला यशाचा दीपस्तंभ म्हणजे अशोक जाधव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूरच्या भूमीतून उठलेला यशाचा दीपस्तंभ म्हणजे अशोक जाधव अशोक जाधव 'महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025' ने सन्मानित आमचा विदर्भ - अन...
चंद्रपूरच्या भूमीतून उठलेला यशाचा दीपस्तंभ म्हणजे अशोक जाधव
अशोक जाधव 'महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025' ने सन्मानित
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २९ मे २०२५) -
        यहोवा यिरे फाउंडेशन, चंद्रपूर या संस्थेमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना "महाराष्ट्र अभिमान पुरस्कार" देण्यात येतो. यावर्षीचा महाराष्ट्र अभिमान पुरस्कार बंजारा समाजातील राष्ट्रीय पातळीवरील कार्यकर्ते अशोक दिगांबर जाधव यांना प्रदान करण्यात आला. जिवती तालुक्यातील दुर्गम भागातील पिटीगुडा नं. १ या बंजारा गावचे रहिवासी असलेले अशोक जाधव हे ऑल इंडिया बंजारा टायगर्स या संस्थेचे राष्ट्रीय महासचिव असून त्यांनी आदिवासी, अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, पोलीस भरती प्रशिक्षण आणि सामाजिक क्षेत्रांत कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली साईबाबा बहुउद्देशीय संस्था मार्फत चालवले जाणारे UPSC, MPSC मार्गदर्शन केंद्र, तसेच वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे सुरू असलेली निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रे ही ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार बनली आहेत.

        आजपर्यंत त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय मिळून एकूण 218 पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाले आहेत. कार्यक्रमाचे आयोजन यहोवा यिरे फाउंडेशन चे सीईओ डॉ. रमेश कुमार बोरकुटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. हा सन्मान कार्यक्रम चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडला. अशोक जाधव याना मराठी चित्रपटातील रांगडा मुवी फेम अभिनेत्री कु. मयुरी नव्हाते, ग्लोबल एक्सलन्स मिसेस युनिव्हर्स महाराष्ट्र सौ. अनुरिता ढोलकीया यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय उद्योग संघटन, दिल्ली सुनील कुमार मांडवे, शिक्षण विभाग, नागपूर सहाय्यक आयुक्त श्रीमती गिरिजाताई उईके, राम सामाजिक शैक्षणिक संस्था लातूर सचिव शेषराव अजगरे, आदिवासी दलित मित्र व पर्यावरण संवर्धन व विकास समिती अध्यक्ष डी.के. आरीकर, राष्ट्रीय प्रधान जनजाती उत्थान संघटन नवी दिल्ली प्रांताध्यक्ष डॉ. देव कन्नाके, रेल यात्री एकता मजदूर संघ अकोला अध्यक्ष नंदगोपाल पांडे, महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र अमरावती प्रशिक्षक सौ. निता जोशी, बिझनेस कोच मुंबई श्री. दत्ता, चंद्रपूर जिल्हा सहकार क्षेत्र लेखा अधिकारी राहुल जोगी, चंद्रपूर जिल्हा सहकार क्षेत्र फेडरेशन श्री. मस्के, विदर्भ नागरी/ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कर्मचारी संघ अध्यक्ष अशोक पिसे, माहिती अधिकार पोलिस मित्र महिला अध्यक्ष सौ. शिल्पा बनपूरकर, राष्ट्रीय उद्योग भारत अमरावती श्री. तांबे, दैनिक नॅशनल संदेश चे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक शर्मा, आमचा विदर्भ न्यूज पोर्टलचे संपादक अनंता गोखरे, तुळसिराम जांभुळकर प्रामुख्याने उपस्थित होते. या पुरस्कारामुळे अशोक जाधव यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेतली गेली असून, बंजारा समाजात आनंदाचे व उत्सवाचे वातावरण आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top