Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भारतीय सैन्याच्या शौर्यास सलाम! चंद्रपुरात तिरंगा रॅलीद्वारे देशभक्तीचा जल्लोष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भारतीय सैन्याच्या शौर्यास सलाम! चंद्रपुरात तिरंगा रॅलीद्वारे देशभक्तीचा जल्लोष महाबोधी महाविहार बौद्धांना सोपवा आरपीआय आठवले जिल्हाध्यक्ष तो...
भारतीय सैन्याच्या शौर्यास सलाम! चंद्रपुरात तिरंगा रॅलीद्वारे देशभक्तीचा जल्लोष
महाबोधी महाविहार बौद्धांना सोपवा आरपीआय आठवले जिल्हाध्यक्ष तोडे यांची पत्रपरिषदेत माहिती
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २९ मे २०२५) -
        भारतीय सैन्याच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांवर केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर संपूर्ण देशात सेनादलाच्या सन्मानार्थ 'तिरंगा सन्मान रॅली'चे आयोजन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चंद्रपूर जिल्हा शाखेमार्फत गुरुवारी 29 मे रोजी 'भारत जिंदाबाद यात्रा' आणि 'तिरंगा सन्मान रॅली' काढण्यात आली. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरु होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त झाली. या रॅलीच्या निमित्ताने RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष गौतम तोडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, "22 मे ते 6 जून दरम्यान जिल्ह्यात तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन सुरू असून, भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करत आम्ही ही रॅली काढली आहे."

रॅलीदरम्यान दोन ठळक मागण्या करण्यात आल्या:
  • पाक अधिकृत काश्मीर (POK) भारतात समाविष्ट करण्यात यावा.
  • बौद्ध धर्माच्या महत्त्वाच्या स्थळांपैकी असलेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध समाजाकडे सोपवावा.
         या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याद्वारे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. रॅलीत प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. यामध्ये जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, विदर्भ प्रदेश सरचिटणीस अशोक घोटेकर, जिल्हाध्यक्ष किरण गेडाम, महिला अध्यक्ष अश्विनी रायपुरे, हंसराज वनकर, संदिप जंगम, प्रभाकर खाडे, नागसेन डांगे, शैलेश राखडे, गीता साखरे, सुप्रशील गेडाम, राहुल मून, प्रविण डोर्लीकर आदींचा सहभाग होता.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top