Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सुमठाना फाट्यावर धान भरलेला ट्रक पलटला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुमठाना फाट्यावर धान भरलेला ट्रक पलटला रस्ता बंद, वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा  (दि. २९ मे २०२५) -       ...
सुमठाना फाट्यावर धान भरलेला ट्रक पलटला
रस्ता बंद, वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २९ मे २०२५) -
        राजुरा-तेलंगणा मार्गावरील सुमठाना फाट्यानजीक गुरुवार, दुपारी सुमारास धानाने भरलेला ट्रक पलटल्याची घटना घडली. या अपघातामुळे काही वेळ मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. विशेषतः अवजड वाहने आणि बससेवेला मोठा फटका बसला. ट्रक पलटल्यानंतर त्यामधील धानाचे पोते रस्त्यावर विखुरले गेले होते. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक अडकून राहिली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने काही पोती बाजूला करत चारचाकी व दुचाकी वाहनांना मार्गदर्शन केले. त्यामुळे लहान वाहने मार्गक्रमण करू शकली; मात्र अवजड वाहनांसाठी रस्ता काही काळ अडथळाग्रस्त राहिला.
        या अपघातामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर केला, तर काहींनी दीर्घ प्रतीक्षा करत गंतव्यस्थानी पोहोचण्याचा मार्ग स्वीकारला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि वाहतूक यंत्रणेची तत्परता व कार्यक्षमता पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे. अपघातानंतरची वाहतूक व्यवस्था सावरण्यासाठी यंत्रणांना अधिक तत्पर व सज्ज असण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
29 May 2025

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top