Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ट्रक ने उडविले दुभाजकावरील सात पोल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ट्रक ने उडविले दुभाजकावरील सात पोल आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क  सावली - गडचिरोली वरून चंद्रपूर कडे जाणारा ट्रक क्रमांक MH 16 AY 9729 जात असत...
ट्रक ने उडविले दुभाजकावरील सात पोल
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क 
सावली -
गडचिरोली वरून चंद्रपूर कडे जाणारा ट्रक क्रमांक MH 16 AY 9729 जात असताना चालकाचे वाहनाचा स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने व्याहड खुर्द येथील रस्त्याच्या दुभाजकावर ट्रक चढला. यामुळे त्या ठिकाणी असलेले इलेक्ट्रिकचे सात पोल ट्रकने उडवून दिले यात महावितरण कंपनीचे दहा लाखाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जाते.
ज्या जागेवर हा अपघात झाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर येऊन गर्दीला पांगविले व रस्ता सुरु करून ट्रक ताब्यात घेतला आणि ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top