Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नौकरीचे आमिष दाखवून दोन तरुणीची 15 लाखांनी फसवणूक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नौकरीचे आमिष दाखवून दोन तरुणीची 15 लाखांनी फसवणूक वणी - वनविभागात नौकरी लावून देतो पैसे द्यावे लागेल असे सांगून दोन तरुणीची तब्बल 15 लाखांनी...
नौकरीचे आमिष दाखवून दोन तरुणीची 15 लाखांनी फसवणूक
वणी -
वनविभागात नौकरी लावून देतो पैसे द्यावे लागेल असे सांगून दोन तरुणीची तब्बल 15 लाखांनी फसवनुक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. रुपाली दादाजी ठमके वय 28 वर्ष रा. केसूर्ली ता. वणी व तीची मैत्रीण सपना झाडे वय 20 वर्ष रा. भालर वसाहत ता. वणी असे फिर्यादीचे तर विलास नामदेव मेडके वय 36 रा. जामणकर नगर असे आरोपीचे नावं आहे. दोन वर्षांपूर्वी रुपालीच्या वडिलाचे निधन झाले. सन 2016 मध्ये ती काही कामानिमित्ये यवतमाळ येथे गेली होती, यावेळेस विलास मेडके यांच्याशी तरुणीसह मैत्रीण सपना झाडे या दोघीची यवतमाळ येथील बसस्टॅन्ड जवळ ओळख झाली व आरोपीनी वनविभागात लिपिक पदाची जागा रिक्त असून वनविभागात नौकरी लावून देतो परंतु पैसे द्यावे लागेल असे सांगितले. यामुळे रुपालीने 2 लाख 30 हजार व 5 लाख 20 हजार असे एकूण 7 लाख 50 हजार तर सपनाने 2 लाख व 5 लाख 50 हजार असे 7लाख 50 हजार असे दोघीकडून सन 2016 ते 2021 या कालावधीत एकूण 15 लाख घेतले. नौकरी बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर दिली यामुळे त्या मुलींना संशय आला व त्यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top