Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गोवरी कॉलनी येथील युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोवरी कॉलनी येथील युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास गोवरी क...
गोवरी कॉलनी येथील युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास गोवरी कॉलनी येथील एका युवकाची दुचाकी क्र. MH 34 BK 8442 आणि कपडे गोवरी जवळील नाल्याजवळ आढळून आले. प्रीतम गुरुदास आवारी वय 24 वर्षे रा. गोवरी कॉलनी असे युवकाचे नाव असून हा युवक पोहायला आला होता. या बाबतची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी एपीआई साखरे व अन्य पोलीस कर्मचारी दाखल झाले पोलिसांनी प्रीतम चा शोध घेतला मात्र नाल्यात तुडुंब पाणी असल्यामुळे त्याचा शोध लावण्यात अडथळा होत होता. आज पहाटे नाल्यातून पूर ओसरल्यानंतर त्याचा मृतदेहच आढळून आला. मृतकाचा मागे आई-वडील व तीन बहिणी असून प्रीतम आवारी यांचे वडील वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात चालक म्हणून कार्यरत आहेत. आई नुकतीच तीर्थयात्रेला गेली असल्याने हा तरुण आपल्या लहान बहीण आणि वडिलांसोबत घरी होता. पण 16 जुलै रोजी दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास प्रीतम मोटारसायकलवरून नाल्याकडे गेला. समोरील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात एपीआई पी.आर. साखरे व पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top