Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेदनादायी प्रवास करून तिने जुळ्या बाळांना दिला जन्म
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेदनादायी प्रवास करून तिने जुळ्या बाळांना दिला जन्म पुराच्या पाण्यामुळे वाहतूक बंद असल्याने धोक्यात पडले होते तीन जीवन धनराजसिंह शेखावत - आम...
वेदनादायी प्रवास करून तिने जुळ्या बाळांना दिला जन्म
पुराच्या पाण्यामुळे वाहतूक बंद असल्याने धोक्यात पडले होते तीन जीवन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील एक गर्भवती महिलेलाप्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु गंभीर स्थिती बघता डॉक्टरांनी तिला चंद्रपूर जिल्हा रुग्णलयातील नेण्यास सांगितले. संपूर्ण चंद्रपूर जिल्हात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने राजुरा- चंद्रपूर व राजुरा-सास्ती  हे चंद्रपूर जाणारे दोन्ही वाहतूक मार्ग पुरामुळे बंद झाले होते. अश्या विषम परिस्थितीत  गरोदर महिलेला ट्रेन ने बल्लारपूर नेण्यात आले. नंतर महिलेने चंद्रपूर रुग्णालयात दोन जुड्या बाळांना जन्म दिला.
सविस्तर माहितीनुसार कोरपना तालुक्यातील नांदा येथील रंजनी सुरेश तलांडे या गर्भवती महिलेला प्रसुती वेदना होत होत्या. यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र नांदाचे आशा सेविका लता गेडाम यांना माहिती देण्यात आली. त्यांनी कोणताही विलंब न करता आटो रिक्शा ने तिला ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे दाखल केले. मात्र त्या गर्भवती मातेची प्रकृती गंभीर असल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्यासाठी सांगितले. मात्र सर्वत्र पुरमयस्थिती असल्याने मुख्यमार्ग बंद होते. तिच्या वेदना वाढत होत्या. अखेर तिला माणिकगड रेल्वे स्थानकावर नेण्यात आले. अश्या विषम परिस्थितीत तिला रेल्वेत बसविण्यात आले. रेल्वेच्या डब्यात शौचालयाच्या बाजुला खाली बसुन तिला बल्लारशहा रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवास करावा लागला. बल्लारपूर स्टेशन वरून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पोहचताच तिने कठीण परिस्थातीवर मात करत दोन जुळ्या बाळांना जन्म दिल्याची सुखद बातमी मिळाली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top