Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: द्विभाजकाला दुचाकीची धडक एक ठार तर एक जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
द्विभाजकाला दुचाकीची धडक एक ठार तर एक जखमी आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क भद्रावती - नागपूर चंद्रपूर महामार्गावरील लोणारा गावाजवळ द्विभाजकाला ध...
द्विभाजकाला दुचाकीची धडक एक ठार तर एक जखमी
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
भद्रावती -
नागपूर चंद्रपूर महामार्गावरील लोणारा गावाजवळ द्विभाजकाला धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेला जखमी झाल्याची घटना गुरुवारला रात्री १० .३o वाजता दरम्यान घडली.
अजिंक्य पंढरी खिरटकर वय २२ वर्षे रा. यश मंगल कार्यालया जवळ विजासन असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर आशीष दिवाकर गौरकर वय २७ वर्ष रा. भद्रावती असे जखमीचे नाव आहे. हे दोघे मित्र दुचाकी एमएच ३४ एझेड ६९१४ या वाहनाने चंद्रपूर येथून भद्रावती कडे येत असताना त्यांच्या वाहनाचे संतुलन बिघडले व लोणारा गावाजवळील द्विभाजकाला त्यांनी जबर धडक दिली यात अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला तर आशीष हा गंभीर जखमी झाला असून त्याचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस ताबडतोब पोहचून घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top