Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा येथे कराटे प्रशिक्षणाचे कलर बेल्ट व प्रमाणपत्र वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिद्द व परिश्रमाने विद्यार्थी स्वयं रक्षणाचे घेतात धडे - बादल बेले राजुरा येथे कराटे प्रशिक्षणाचे कलर बेल्ट व प्रमाणपत्र वितरण ओकिनावा मार्श...
जिद्द व परिश्रमाने विद्यार्थी स्वयं रक्षणाचे घेतात धडे - बादल बेले
राजुरा येथे कराटे प्रशिक्षणाचे कलर बेल्ट व प्रमाणपत्र वितरण
ओकिनावा मार्शल आर्ट्स अकॅडमी व कराटे प्रशिक्षण केंद्र चा कार्यक्रम संपन्न
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा येथील ओकिनावा मार्शल आर्ट्स अकॅडमी व प्रकाश पचारे यांच्या कराटे प्रशिक्षण केंद्र चा कलर बेल्ट वितरण व प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बादल बेले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून विजय जांभूळकर, नागपूर विभाग अध्यक्ष नेफडो, अल्का सदावर्ते, नागपूर विभाग अध्यक्षा, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती, दिलीप सदावर्ते, माहिती व जनसंपर्क अधिकारी नेफडो, चंद्रपूर, अँड. राजेंद्र जेनेकर, सुनील रामटेके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांना वृक्षभेट देण्यात आली. प्रकाश पचारे यांच्या कराटे प्रशिक्षण केंद्रातील उत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये बेस्ट परफॉर्मन्स जुनियर म्हणून आर्यन दोरखंडे, अन्वी बुऱ्हान, सिद्धांत शुक्ला, बेस्ट परफॉर्मन्स सीनियर म्हणून तन्वी रामटेके, मयुरी वैरागडे, गणेश कुकडे, बेस्ट ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स म्हणून प्रथमेश पचारे, तक्षु कडूकर, बेस्ट परफॉर्मन्स अँड बिव्हेइयर समृद्धी पेठे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून बादल बेले यांनी कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेंच जिद्द व परिश्रमाणे हे विद्यार्थी स्वयं रक्षणाचे प्रशिक्षण घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही अभिनंदन केले. यावेळी नगर परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता नगर परिषदेच्या वतीने  प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती त्यावेळी प्रकाश पचारे यांनी तेथील विद्यार्थिनी तक्षु कडुकर हिला योग्यरित्या कराटे प्रशिक्षण दिल्यामुळे तिने स्वतःच्या परिश्रमाने आपल्या आर्थिक परिस्थितीवर मात करत चंद्रपूर येथील झालेल्या स्पर्धेच्या सामण्यात सुवर्ण पदक मिळविले. ती सध्या राजुरा येथील जिप शाळेत इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. तिच्या कार्याबद्दल उपस्थितांनी तिचे कौतुक केले. यावेळी येलो ते ब्राऊन कलर पर्यंतच्या बेल्ट चे व प्रमाणपत्र चे वितरण केले. तक्षु कडुकर व प्रथमेश पचारे या विध्यार्थीना ब्राऊन बेल्ट प्राप्त झाला आहे. संचालन जय पचारे यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश पचारे यांनी तर आभार रत्नाकर पचारे यांनी मानले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top