Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माजी जिप सभापती सुनिल उरकुडे यांनी यांनी दिली पूरग्रस्त कोलगाव ला भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी जिप सभापती सुनिल उरकुडे यांनी यांनी दिली पूरग्रस्त कोलगाव ला भेट रस्ता साफ करून सुरळीत करण्याचे दिले निर्देश विरेंद्र पुणेकर - आमचा विद...
माजी जिप सभापती सुनिल उरकुडे यांनी यांनी दिली पूरग्रस्त कोलगाव ला भेट
रस्ता साफ करून सुरळीत करण्याचे दिले निर्देश
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातून पुराचे पाणी ओसरताच मागील सहा दिवसापासून सर्वच गावाशी संपर्क तुटलेल्या कोलगाव गावाला भेट दिली. सुनिल उरकुडे यांनी पुरामुळे घरांची झालेली पडझड, शेतीचे नुकसान पाहून योग्य सर्वे करण्याची मागणी केली. तसेच प्रशासनाला त्वरित गावातील चिखलेले रस्ते साफ करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले. सुनिल उरकुडे यांच्या निवेदनामुळे वेकोलि अधिकाऱ्यांनी त्वरित रस्ता साफ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावेळी कोलगावचे माजी सरपंच तथा उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, सदस्य अक्षय निब्रड, पवन पोतराजे, रामदास मोरे, सागर उरकुडे, निखिल वैद्य, बालाजी काळे, मनोज पोतराजे, रामदास उपरे, प्रशांत मोरे, वासुदेव पिंपळकर, मारोती भोंगळे, बालाजी मोहारे, अविनाश वैद्य, राकेश कुबडे व गावकरी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top