Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: हर्षा कंपनीला वंचितचा ईशारा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर ( दि. 18 मे 2023) -         राजूरा तालुक्यातील साखरी गावात हर्षा ...
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर ( दि. 18 मे 2023) -
        राजूरा तालुक्यातील साखरी गावात हर्षा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कार्यरत असून या कंपनीत साधारण चारशेच्या वर कामगार काम करत असून सदर कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परराज्यातील युवकांना रोजगार दिला हा स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय आहे करिता स्थानिकांना 80 टक्के रोजगारात घेण्यात यावे अशी मागणी वंचित बहूजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हर्षा कंपनी व्यवस्थापनाला करण्यात आली. (Give employment to the local Bhoomiputras)

        हर्षा कंपनी राजूरा तालुक्यातील साखरी येथे कार्यरत असुन या कंपनीमध्ये जवळ जवळ चारशेच्या वर काम करतात स्थानिक साखरी व राजुरा परीसरातील हर्षा कंपनीने स्थानिकांना डावलून परराज्यातील लोकांना रोजगार दिला असल्याच्या अनेक तक्रारी वंचित बहूजन आघाडी जिल्हाध्यक्ष फुसे यांना प्राप्त झाल्या, हा स्थानिक बेरोजगार भुमिपुत्रांवर घोर अन्याय असून याचा (Vanchit Bahujan Aaghadi) वंचित बहूजन आघाडी च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

        हर्षा कंपनीसारख्या मिट्टी कंपनीमुळे या परिसरात वायु प्रदुषण, ध्वनी प्रदुषण व पाणी दुषित होते, तसेच रस्त्यांची दुर्वस्था झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले, घरांना ब्लॉस्टिंगचे हादरे बसतात अशा अनेक समस्यांचा स्थानिक लोकांना नाहक त्रास होत आहे. हा सर्व त्रास स्थानिक भूमिपुत्र सहन करीत असून स्थानिक कंपन्यामध्ये रोजगारावर प्रथमहः स्थानिक भुमिपुत्रांचा अधिकार आहे. रोजगारामध्ये ८० टक्के आरक्षण स्थानिक भुमिपुत्रांना देण्यात यावे असा राज्य सरकार चा नियम असतांनाही सदर कंपनी ने नियम डावलला.

        हर्षा कंपनीने साखरी व राजुरा परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांना 72 तासात रोजगार उपलब्ध करून द्या, अन्यथा वंचित बहुजन आघाडी व स्थानिक नागरिक रस्त्यांवर उतरुन तीव्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा हर्षा कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आला. सदर मागणीची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी चंद्रपुर, पोलिस अधिक्षक, चंद्रपुर, उपविभागीय पोलिस अधिकारी, राजुरा, क्षेत्रिय महाप्रबंधक, वेकोली, बल्लारपुर एरिया, सब एरिया मॅनेजर, वेकोली, पवनी २, जनरल मॅनेजर, हर्षा कंपनी प्रा.लि., पोलिस निरिक्षक राजुरा यांना देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, रामदास चौधरी, साखरी व परिसरातील गावातील असंख्य बेरोजगार युवकांची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top